रक्ताने माखलेला मृतदेह आढळल्याने भादली गावात खळबळ

On: October 3, 2022 5:52 PM

जळगाव : कपाळावर धारदार शस्त्राच्या घावासह रक्ताच्या थारोळ्यात तरुणाचा भादली ते शेळगाव दरम्यान आज सकाळी आढळून आला. या घटनेची माहिती समजताच परिसरातील नागरिकांनी घटनास्थळावर गर्दी केली होती. दरम्यान या घटनेने भादली गावासह परिसरात मोठी खळबळ माजली आहे. सौरभ यशवंत चौधरी (31), रा. दशरथ नगर, का. उ. कोल्हे शाळेजवळ जळगाव असे हत्या झालेल्या तरुणाचे नाव निष्पन्न झाले आहे.

या घटनेची माहिती मिळताच अप्पर पोलिस अधिक्षक चंद्रकांत गवळी, स्थानिक गुन्हे शाखेचे पो.नि. किसनराव नजनपाटील, नशिराबाद पोलिस स्टेशनचे सहायक पोलिस निरीक्षक अनिल मोरे यांच्यासह पोलिस उप निरीक्षक राजेंद्र साळुंखे व कर्मचा-यांनी घटनास्थळावर धाव घेत पुढील तपासाला वेग दिला.

3 ऑक्टोबर रोजी सोमवारी सकाळी अकरा वाजेच्या सुमारास भादली ते शेळगाव दरम्यान पुलानजीकच्या पाटचारीत परिसरातील लोकांना तरुणाचा मृतदेह आढळून आला. त्यांनी या घटनेची माहिती नशिराबाद पोलिसांना कळवली. घटनास्थळासह मृतदेहाचा पंचनामा केल्यानंतर मृतदेह शासकीय रुग्णालयात रवाना करण्यात आला. अधिक तपास सुरु आहे.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

Leave a Comment