माध्यम प्रतिनिधींना खोटी माहिती दिल्याचा आरोप – विजय पाटील यांच्यासह इतरांविरुद्ध गुन्हा

On: October 8, 2022 5:34 PM

जळगाव : निलेश रणजीत भोईटे यांच्या निवासस्थानी कोथरुड पुणे पोलिसांनी टाकलेल्या छापा कारवाईत दस्तावेज कसे दाखल करायचे व ते छाप्यात हस्तगत झाल्याचे कसे दाखवायचे याशिवाय त्यांच्या घरात सुरा कसा ठेवायचा असे कट कारस्थान रचून माध्यम प्रतिनिधींना खोटी माहिती दिल्याच्या आरोपाखाली जळगाव शहर पोलिस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे. निलेश रणजीत भोईटे यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार विजय भास्कर पाटील, किरणकुमार साळुंखे व त्यांचे इतर साथीदार यांच्याविरुद्ध गु.र.न. 323/22 भा.द.वि. 420, 448, 120(ब), 193, 467, 468, 471, 511, 34 नुसार सदर गुन्हा जळगाव शहर पोलिसात दाखल करण्यात आला आहे. दरम्यान दाखल करण्यात आलेल्या या गुन्ह्याने खळबळ उडाली आहे.

वर्तमानपत्र प्रतिनिधींना खोटी माहिती दिल्याच्या आरोपासह निलेश भोईटे यांच्या घरात अनाधिकारे प्रवेश करुन घरातील महत्वाचे दस्तावेज, प्रोसेडींग बुक, रबरी स्टॅंप, बॅंकेचे चेकबुक, लेटरपॅड व इतर महत्वाचे दस्तावेज बनावटीकरण करण्यासाठी नेल्याचा देखील आरोप करण्यात आला आहे. याप्रकरणी पोलिस निरीक्षक विजयकुमार ठाकुरवाड पुढील तपास करत आहेत. याप्रकरणी अद्याप कुणालाही अटक करण्यात आलेली नाही.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

Leave a Comment