बारा वर्षाच्या बालिकेवर अत्याचारप्रकरणी तरुणास अटक

On: October 11, 2022 8:07 AM

जळगाव : भुसावळ शहरातील बारा वर्षाच्या बालिकेस लग्नाचे आमिष दाखवून तिच्यावर वेळोवेळी शारीरिक संबंध प्रस्थापीत करणा-या तरुणाविरुद्ध भुसावळ तालुका पोलिस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे. भावेश योगेश तायडे (वय 18) रा. 741 ईएफ, 7 नंबर पोलिस चौकीच्या मागे भुसावळ असे अटक करण्यात आलेल्या तरुणाचे नाव आहे.

भावेश याने सर्वप्रथम 23 जुलै रोजी ताप्ती पब्लिक स्कुलच्या गेटवर पिडीत बालिकेस बोलावून तिची भेट घेतली. मला तुझ्याशी बोलायचे आहे असे सांगून तो तिला त्याच्या स्कुटीवर बसवून सात नंबर पोलिस चौकीच्या मागे पडीक रेल्वे क्वार्टरच्या रुममधे घेवून गेला. तु मला खुप आवडतेस, मला तुझ्याशी लग्न करायचे आहे असे तिच्याशी गोड बोलून अंगलट करुन तिच्यासोबत शरीरसंबंध प्रस्थापित केले. त्यानंतर पुन्हा 19 ऑगस्ट रोजी त्याने तिला शाळेच्या गेटवर बोलावून स्कुटीवर बसवून जामनेर रोडवरील एका धार्मिक स्थळानजीक एका गार्डनमधे नेले. त्याठिकाणी त्याने तिच्या खांद्यावर हात ठेवून तु मला खुप आवडते असे म्हणून तिच्याशी अंगलट केली. गेल्या दोन महिन्यापासून त्याने तिचा पाठलाग करुन तिचा विनयभंग केला. त्यानंतर तिला वेळोवेळी लग्नाचे आमिष दाखवले.

त्याने तिला तिचे घर सोडून त्याच्या घरी येण्यास सांगितले. 10 ऑक्टोबर रोजी भल्यापहाटे साडेचार वाजता त्याच्या सांगण्यावरुन ती तिच्या पालकांच्या संमतीशिवाय घर सोडून त्याच्याकडे गेली. याप्रकरणी पिडीत बालिकेने दिलेल्या फिर्यादीनुसार दिलेल्या फिर्यादीनुसार भुसावळ तालुका पोलिस स्टेशनला भावेश तायडे याच्याविरुद्ध गु.र.न. 172/22 भा.द.वि. 376(1), 376 (2), (आय), 363, 354, अ (1) (आय), 354 (ड), 323, 506 सह बालकांचे लैंगिक अपराधापासून संरक्षण अधिनियम 2012 कलम 4,8,12 नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. भावेश यास अटक करण्यात आली असून स.पो.नि. प्रकाश वानखेडे पुढील तपास करत आहेत.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

Leave a Comment