तरुणाच्या हत्येप्रकरणी चाळीसगाव ग्रामीण पोलिसात गुन्हा

On: October 14, 2022 9:02 AM

जळगाव : एकमेकांकडे बघण्याच्या किरकोळ कारणावरुन चाळीसगाव तालुक्यातील वाघळी या गावी तरुणाच्या पोटावर चाकू हल्ला झाला होता. 12 ऑक्टोबर रोजी सायंकाळी झालेल्या या घटनेत तरुण मृत्युमुखी पडला होता. या घटनेप्रकरणी चाळीसगाव ग्रामिण पोलिस स्टेशनला खूनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मोहन विजय हाडपे असे हत्या झालेल्या तरुणाचे नाव आहे. मयत मोहनचे काका रविंद्र भास्कर हाडपे यांनी याप्रकरणी फिर्याद दाखल केली आहे.

12 ऑक्टोबर रोजी सायंकाळी मोहन विजय हाडपे आणि त्याचा मित्र प्रविण पुरुषोत्तम धनगर या दोघांना वाघळी येथील सैय्यद मुसा खाटीक, साजीद मुसा खाटीक, आदिल साजीद खाटीक, तनवीर साजीद खाटीक,समीर सैय्यद खाटीक अशा सर्वांनी मिळून व्यायामशाळेजवळ असलेल्या मोकळ्या जागी लोखंडी रॉडने मारहाण केली होती. दोघांना होत असलेली मारहाण आणि वाद सोडवण्यासाठी रविंद्र हाडपे आणि सुनिल सुभाष धनगर यांनी धाव घेतली.

त्यावेळी आदिल खाटीक याने रविंद्र हाडपे यांच्या डोक्यात रॉड हाणला. तनवीर आणि समीर यांनी मोहनचे दोन्ही हात पकडून ठेवले. त्यानंतर आदिल याने चाकूने मोहनच्या पोटावर चाकूने वार केले. यात तो ठार झाला. या घटनेतील दोघांना अटक करण्यात आली असून पोलिस उप निरीक्षक कुणाल चव्हाण तपास करत आहेत.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

Leave a Comment