जळगाव : दारुच्या नशेत अल्पवयीन मुलीची छेड काढणाऱ्या तरुणास एमआयडीसी पोलिसांच्या गुन्हे शोध पथकाने अटक केली आहे. तबरेज ऊर्फ अच्छु ईब्राहीम शेख रा. तारगल्ली, तांबापुरा जळगांव असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे.
इयत्ता दहावीच्या वर्गात शिकणारी तांबापुरा भागात राहणारी मुलगी 13 ऑक्टोबर रोजी सकाळी अंगणात झाडू मारत होती. त्यावेळी तबरेज हा दारुच्या नशेत तिच्याजवळ आला. त्याने तिच्याजवळ येऊन तिला जवळ ओढून तिची छेड काढली होती. ती ओरडल्यानंतर आजूबाजूचे लोक घटनास्थळी धावत आले. त्यांनी तिची तबरेजच्या तावडीतून सुटका केली होती. दरम्यान तबरेज पळून गेला होता. त्याच्याविरुद्ध एमआयडीसी पोलिस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला होता.
पोलिस हेड कॉन्स्टेबल अल्ताफ पठाण, पो.कॉ. किशोर पाटील यांनी आज त्याला अटक केली. पुढील तपास पोलिस उप निरीक्षक रवींद्र गिरासे करत आहेत.