सहा वर्षापासून फरार आरोपीस एलसीबीने केली अटक

जळगाव : चाळीसगाव शहर पोलिस स्टेशनला दाखल फसवणूकीच्या गुन्ह्यातील सहा वर्षापासून फरार आरोपीस स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने अटक केली आहे. भगवान भिका सोनवणे रा. पिंप्रीहाट ता.भडगाव असे अटकेतील आरोपीचे नाव आहे. गेल्या सहा वर्षापासून तो भडगाव सोडून गुजरात राज्यात निघून गेला होता.

फसवणूकीच्या गुन्ह्यातील आरोपी भगवान सोनवणे हा सुरज (गुजरात) येथून बसने भडगावच्या दिशेने येत असल्याची गोपनीय माहिती पो.नि.किसनराव नजनपाटील यांना समजली. त्या माहितीच्या आधारे त्यांनी पथक रवाना केले. स.पो.नि. जालिंदर पळे, पोहेकॉ सुनिल पंडीत दामोदरे, पोहेकॉ लक्ष्मण अरुण पाटील, पोना रणजित अशोक जाधव, पोना किशोर ममराज राठोड, पोकॉ विनोद सुभाष पाटील, चापोकॉ प्रमोद ठाकुर आदींच्या पथकाने भगवान सोनवणे यास पिंप्रीहाट व कोळगाव बस स्थानकावर सापळा रचून ताब्यात घेतले. पुढील तपासकामी त्याला चाळीसगाव शहर पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here