घरगुती गॅस वाहनांमधे भरुन देणा-याविरुद्ध कारवाई

जळगाव : घरगुती गॅस वाहनांमधे इंधनाच्या स्वरुपात भरुन देणा-या तरुणाविरुद्ध जिवनावश्यक वस्तु कायदा कलमाखाली गुन्हा एमआयडीसी पोलिस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे. एलसीबी आणि एमआयडीसी पोलिसांच्या संयुक्त पथकाने या कारवाईत सहभाग घेतला. इमरान शेख समद रा. रथ चौक, जळगाव असे गुन्हा दाखल करण्यात आलेल्या तरुणाचे नाव आहे. त्याच्या कब्जातून सिलेंडरसह इतर मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे.

एमआयडीसी परीसरातील जळगाव औरंगाबाद रस्त्यावर जळगाव टोल नाक्या समोर हा प्रकार सुरु असल्याची माहिती एलसीबी पोलिस निरीक्षक किसनराव नजनपाटील यांना समजली होती. त्या माहितीच्या आधारे सदर कारवाई करण्यात आली.

एलसीबीचे पो.नि.किसनराव नजनपाटील यांच्या पथकातील पोहेकॉ जितेंद्र पाटील, महेश महाजन, पो.ना.नितीन बाविस्कर, अविनाश देवरे यांच्यासह एमआयडीसी पोलिस स्टेशनचे पोलिस उप निरीक्षक अनिस शेख, सहायक फौजदार अतुल वंजारी, पो.ना. इमरान अली सैय्यद, पोना सचिन पाटील आदींनी या कारवाईत सहभाग घेतला. पोलिस पथकाने ताब्यात घेतलेल्या इमरान शेख समद याच्या कब्जातून सिल तुटलेल्या अवस्थेतील चार सिलेंडर, सुस्थितील सहा सिलेंडर, मोटर पंप, वजनकाटा असा एकुण 27 हजार 700 रुपये किमतीचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे. पोलिस नाईक नितीन बाविस्कर यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार इमरान शेख याच्याविरुद्ध एमआयडीसी पोलिस स्टेशनला भादवि कलम 285 सह जिवनावश्यक वस्तु कायदा कलम 3, 7 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील कारवाई सुरु आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here