शरीरसुखाची ऑफर – डॉक्टरला 7 लाखांच्या खंडणीची मागणी

जळगाव : जळगाव शहरातील एका डॉक्टरला महिलेकडून सुरुवातीला शरीरसुखाची ऑफर देण्यात आली. महिलेने तिच्या व डॉक्टरच्या भेटीचे साथीदारांच्या मदतीने मोबाईलमधे व्हिडीओ शुटींग केले. त्या व्हिडीओ शुटींगच्या आधारे सात लाख रुपयांची खंडणी मागण्याचा प्रकार उघडकीस आला आहे. याप्रकरणी डॉक्टरने दिलेल्या फिर्यादीनुसार जळगाव शहर पोलिस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

जळगाव शहरातील रामानंद नगर परिसरात राहणा-या डॉक्टरला दोघा महिलांनी शरीरसुखाची ऑफर दिली. यापैकी एक महिला जळगाव शहरातील व दुसरी यावल तालुक्यातील आहे.

महिलांसोबत डॉक्टरची एका क्रिटीकल केअर सेंटरमधे, सागर पार्क मैदान व एका महाविद्यालय परिसरात भेट झाल्याचे समजते. या भेटीचे दोघा महिलांच्या साथीदारांनी व्हिडीओ चित्रीकरण करुन घेतले. या व्हिडीओ चित्रीकरणाच्या बळावर चेतन व हिरामन नावाच्या दोघांनी डॉक्टरला चापटाबुक्क्यांनी मारहाण करत व्हीडीओ व्हायरल करण्याची धमकी दिली. प्रदिप व संदीप या दोघांच्या मदतीने सात लाख खंडणीची मागणी करण्यात आली. सात लाख रुपये दिले तरच तुमचे मॅटर संपेल नाहीतर हे व्हिडीओ व्हायरल केले जाईल व तुमची समाजात बदनामी होईल, जीवनातून उठवून टाकण्याची धमकी देण्यात आली.

या घटनेप्रकरणी एकुण आठ जणांविरुद्ध जळगाव शहर पोलिस स्टेशनला गु.र.न. 336/22 भा.द.वि. 389, 323, 506, 34, 120(ब) नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या गुन्ह्यात चार महिला व चार पुरुष अशा एकुण आठ जणांचा समावेश आहे. पुढील तपास पोलिस उप निरीक्षक सर्जेराव क्षिरसागर करत आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here