जळगाव : बेकायदा गावठी पिस्टल बाळगत दहशत माजवणा-या तरुणास स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने अटक केली आहे. अर्जुन भास्कर पाटील रा. नागसेन कॉलनी कंडारी ता. भुसावळ असे अटक करण्यात आलेल्या तरुणाचे नाव आहे.
अर्जुन पाटील हा गावठी पिस्टल बाळगत दहशत माजवत असल्याची माहिती स्थानिक गुन्हे शाखेचे पो.नि. किसनराव नजनपाटील यांना समजली होती. त्या माहितीच्या आधारे त्याचा शोध घेण्याकामी त्यांनी आपल्या पथकाला रवाना केले होते. अर्जुन पाटील यास त्याच्या कब्जातील 25 हजार रुपये किमतीच्या गावठी बनावटीच्या पिस्टलसह अटक करण्यात आली आहे.
पुढील तपासकामी त्याला भुसावळ शहर पोलिस स्टेशनच्या ताब्यात देण्यात आले आहे. सहायक फौजदार अनिल जाधव, कमलाकर बागुल, अनिल देशमुख, संतोष मायकल व भारत पाटील आदींच्या पथकाने या कारवाईत सहभाग घेतला.