जळगाव : मंदीरातील साहित्य चोरी करणा-या पोलिसांच्या अभिलेख्यावरील गुन्हेगारास स्थानिक गुन्हे शाखेच्या तपास पथकाने अवघ्या चोवीस तासांच्या आत अटक केली आहे. सुरेश बबनराव केवारे (65) रा. खामगांव जिल्हा बुलढाणा ह.मु जळगांव रेल्वे स्टेशनच्या मागे जळगांव असे अटक करण्यात आलेल्या चोरट्याचे नाव आहे. जिल्हापेठ पोलिस स्टेशनला दाखल जागृत महादेव मंदीरातील साहित्य चोरीचा गुन्हा उघड झाला आहे.
स्थानिक गुन्हे शाखेचे पो.नि. किसनराव नजनपाटील यांना समजलेल्या माहितीच्या आधारे सुरेश बबनराव केवारे यास त्यांच्या तपास पथकाने शोधून आणले. त्याने आपला गुन्हा कबुल केला आहे.
पोलिस अंमलदार विजयसिंग पाटील, सुधाकर अंभोरे, जितेंद्र पाटील, अकरम शेख, विजय शामराव पाटील, नितीन बाविस्कर, प्रितम पाटील, अविनाश देवरे, हरीष परदेशी आदींच्या पथकाने सुरेश केवारे यास रेल्वे स्टेशनच्या मागील पुलाखालून ताब्यात घेण्यात आले. त्याच्याकडून चोरीच्या अजून घटना उघड होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. अटकेतील आरोपीपुर्वी जळगाव शहर पोलिस स्टेशन हद्दीत मंदीरातील साहित्य चोरी केल्याप्रकरणी एक वर्षाची शिक्षा झाली आहे.