ठाणे : दोन हजार रुपये चलनी दराच्या एकुण आठ कोटी रुपयांच्या बनावट नोटा विक्री करण्यासाठी आलेल्या दोघांना ठाणे शहर गुन्हे शाखेच्या घटक पाचच्या पथकाने अटक केली आहे. राम हरी शर्मा (52) एम/603, पेनिन्सुला पार्क, न्यु विवा कॉलेज रोड, बोळींज, विरार वेस्ट, डी. मार्ट जवळ, पालघर आणि राजेद्र रघुनाथ राउत (58) रा. परनाई नाका, शिवप्रभा हॉटेल समोर घर नं. 219 कुरगांव, ता. जि. पालघर अशी अटक करण्यात आलेल्या दोघांची नावे आहेत.
11 नोव्हेंबर 2022 रोजी सकाळी दहाच्या सुमारास घोडबंदर रोड, गायमुख चौपाटी, जी.बी. रोड, ठाणे (पश्चिम) याठिकाणी इनोव्हा कारमधून दोघेजण बनावट चलनी नोटा विक्री करण्यासाठी येणार असल्याची माहिती गुन्हे शाखा, घटक पाचचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक विकास घोडके यांना मिळाली होती. त्या माहितीच्या आधारे एका पथकाची निर्मीती करण्यात आली. सापळा रचून दबा धरुन बसलेल्या पथकाने दोघांना त्यांच्या ताब्यातील आठ कोटी रुपयांच्या बनावट नोटांसह ताब्यात घेत अटक केली. या बनावट नोटा त्यांनी मदन चव्हाण याच्या मदतीने पालघर येथील गोडावूनमधे छापून विक्रीसाठी आणल्या होत्या.
याप्रकरणी सहायक पोलिस निरीक्षक अविनाश रामदास महाजन यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार भाग 5 गु.र.न. 373/22 भा.द.वि. कलम 489(अ), 489(ब), 489(क), 34 नुसार गुन्हा दाखल करण्यात आला. पुढील तपास पोलीस निरीक्षक अरुण क्षिरसागर करत आहेत. ठाणे शहर पोलीस आयुक्तालयाचे पोलीस आयुक्त जयजीत सिंग, पोलीस सह आयुक्त दत्तात्रय कराळे, अप्पर पोलीस आयुक्त (गुन्हे) अशोक मोराळे, सहायक पोलीस आयुक्त, शोध 1, अशोक राजपुत यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलिस निरीक्षक विकास घोडके (गुन्हे शाखा वागळे युनिट-5, ठाणे), पो. निरी. अरुण क्षिरसागर, सहा. पो. निरी. भुषण शिंदे, स.पो.निरी अविनाश महाजन, पो.उप. निरी शिवाजी कानडे, स.पो.उप.निरी शशिकांत सालदुर, पो.हवा. सुनिल रावते, पो.हवा. रोहीदास रावते, पो. हवा. सुनिल निकम, पो. हवा. संदिप शिंदे, पो. हवा. विजय पाटील, पो. हवा. अजय फराटे, पो. हवा जगदिश न्हावळदे, शशिकांत नागपुरे, पो.ना. तेजस ठाणेकर, पो. ना. उत्तम शेळके, पो.ना. रघुनाथ गार्डे, पो. कॉ. शंकर परब, चालक पो. कॉ. यश यादव आदींनी या तपासकामी सहभाग घेतला.