जळगाव : साखरपुडा झाल्यानंतर होणारे लग्न मोडण्यासाठी उपवधूच्या भावाला बदनामीकारक मेसेज पाठवणा-या अज्ञाताविरुद्ध सायबर पोलिस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
साखरपुडा झाल्यानंतर लवकरच लग्न होणा-या भुसावळ तालुक्यातील उपवधूच्या भावाला अज्ञात इंस्टाग्राम धारकाने एक बदनामीकारक मेसेज पाठवला आहे. त्या मेसेजमधे त्याच्या बहिणीचा होणा-या पतीसोबतचा फोटो पाठवला. त्या फोटोमधे भावी पतीने एक बाई ठेवली असून तिच्यापासून एक मुलगी असल्याचे लिहिले आहे. हे लग्न करु नका तुमची फसवणूक होईल असा देखील मजकुर इंस्टाग्रामच्या माध्यमातून पाठवला.
बहिणीचा झालेला साखरपुडा मोडून लग्न होवू नये या उद्देशाने बदनामीकारक मजकूर पाठवणा-या अज्ञात इन्स्टाग्राम खातेधारकाविरुद्ध सायबर अॅक्टनुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या गुन्ह्याचा पुढील तपास पोलिस निरीक्षक लिलाधर कानडे करत आहेत.