बलात्कार आणि फसवणूकीच्या गुन्ह्यातील तिघांना अटक

On: November 19, 2022 3:53 PM

जळगाव : लग्नाचे आमिष दाखवत महिलेसोबत शरीरसंबंध ठेवणा-या फरार संशयीत आरोपीस अटक करण्यात आली आहे. याशिवाय व्यवसायात फसवणूक करणा-या दोघांना देखील अटक करण्यात आली आहे. या दोन्ही गुन्ह्यातील एकुण तिघांना एमआयडीसी पोलिसांच्या गुन्हे शोध पथकाने पुणे येथून अटक केली आहे.

गणेश निवृत्ती सपकाळे असे बलात्काराच्या गुन्ह्यात अटक करण्यात आलेल्या संशयीत आरोपीचे नाव आहे. भादली येथील मुळ रहिवासी व सध्या पुणे येथे राहणा-या गणेश सपकाळे याने एका महिलेस लग्न करण्याचे खोटे आश्वासन दिले होते. त्या आश्वासनावर त्याने महिलेसोबत शरीरसंबंध प्रस्थापित केले होते. त्यानंतर तो फरार झाला होता. याप्रकरणी एमआयडीसी पोलिस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तांत्रिक पुराव्याच्या आधारे गणेश निवृत्ती सपकाळे यास पुणे येथील शिरुर परिसरातून ताब्यात घेत अटक करण्यात आली आहे.

भंगारच्या व्यवसायात भागीदार होण्यासाठी विश्वास संपादन करुन 11 लाख 90 हजार रुपयांची फसवणूक करणा-या दोघांना देखील एमआयडीसी पोलिसांनी पुणे येथून केली आहे. सतोष गुलाब खाडे आणि चंद्रकांत सुनिल जाधव दोघे रा.हडपसर पुणे अशी अटक करण्यात आलेल्या दोघांची नावे आहेत. या दोघांनी अब्दुल जब्बार कादर पटेल रा. मेहरुण यांची फसवणूक केल्याप्रकरणी एमआयडीसी पोलिस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तांत्रीक पुराव्याच्या आधारे क्राईम युनीट एकच्या मदतीने दोघांना पुणे स्टेशन रोड परिसरातून अटक करण्यात आली. पोलीस निरीक्षक प्रताप शिकारे यांच्या पथकातील पोलिस उप निरीक्षक अनिस शेख, सहायक फौजदार आनंदसिंग पाटील, पोना विकास सातदिवे, पोकॉ छगन तायडे आदींनी या कारवाईत सहभाग घेतला.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

Leave a Comment