जळगाव : जनमत प्रतिष्ठान तसेच मुक्ताई महिला संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने आरोग्य शिबीराचे आयोजन करण्यात आले होते. जळगाव शहरातील मुक्ताईनगर कॉलनी प्रभाग क्रमांक नऊ मधे कोविड लसीकरणाचा पहिला व दुसरा डोस नागरिकांना देण्यात आला. यावेळी नागरिकांची मोफत आरोग्य तपासणी देखील करण्यात आली.
इंटरेस्ट्रीयल डायमंड प्रायव्हेट लिमिटेडच्या सहयोगातून आयोजीत करण्यात आलेल्या या शिबीरात आरोग्य तपासणीसह कोविड लसीकरणाला चांगला प्रतिसाद लाभला. आरोग्य तपासणी दरम्यान मंगेश गावंडे यांनी परिसरातील नागरिकांना शरीर निरोगी कसे असावे याबद्दल मार्गदर्शन केले. डॉ. शिल्पा चव्हाण यांनी नागरिकांची तपासणी केली. दिशा पॅथॉलॉजीचे विशाल परदेशी यांनीदेखील रुग्णांना यावेळी मार्गदर्शन केलेल.
जनमत प्रतिष्ठानचे अध्यक्ष पंकज नाले, मुक्ताई महिला बहुउद्देशीय संस्थेचे अध्यक्ष व नगरसेविका सौ. नीताताई सोनवणे, नगरसेविका प्रतिभा देशमुख, प्रा,विजय वानखेडे, कवी प्रकाश पाटील, अॅडवोकेट हेमंत दाभाडे, चेतन सोनार, चेतन सोनवणे, डॉ. शिल्पा चव्हाण, हर्षाली पाटील, विशाल परदेशी, मंगेश गावंडे व त्यांची टीम व शिक्षक नवल पाटील यांचे यावेळी मार्गदर्शन लाभले