जळगाव : मुक्ताईनगर पोलिस स्टेशन हद्दीत सराफास लुटणारी टोळी स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने गजाआड केल्यानंतर विविध गुन्ह्यांची उकल झाली असून गुन्हे उघडकीस आले आहेत. मोटार सायकलस्वारांना लुटीचे प्रकार जळगाव जिल्ह्यात गेल्या काही दिवसांपासून मोठ्या प्रमाणात वाढले होते. हे लुटीचे प्रकार लक्षात घेत पोलिस अधिक्षक एम. राजकुमार यांनी स्थानिक गुन्हे शाखेचे पो.नि. किसनराव नजनपाटील यांना तपासकामी विशेष सुचना दिल्या होत्या.
स्थानिक गुन्हे शाखेचे पो.नि. किसनराव नजनपाटील यांना मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारे त्यांच्या पथकातील सहका-यांनी जळगाव शहरात विविध संशयीत आरोपींच्या शोधार्थ छापे टाकले. या छापेमारीत जळगाव एमआयडीसी पोलिस स्टेशन हद्दीतील सुप्रिम कॉलनी परिसरातून सुनिल मिश्रीलाल जाधव (रा. अंजाळे चिंचखेडा ता. धुळे ह.मु. मच्छी बाजार सुप्रिम कॉलनी, जळगाव), प्रकाश वसंत चव्हाण (रा. भिकनगाव जि. खरगौन – म.प्र., ह.मु. रामदेव बाबा मंदिराजवळ सुप्रिम कॉलनी, जळगाव, आकाश दिलीप पवार रा. लोणवाडी ता. जळगाव, ह.मु. भवानी चौक सुप्रिम कॉलनी, जळगाव) अशा तिघांना शिताफीने ताब्यात घेण्यात आले.
ताब्यातील तिघा संशयीतांना चौकशीकामी एमआयडीसी पोलिस स्टेशनला आणले गेले. पोलिसी खाक्याचा वापर करुन त्यांच्याकडून माहिती संकलीत करण्यात आली. त्यांनी मुक्ताईनगर पोलिस स्टेशन हद्दीत नरवेल रोडवर एका सराफाची लुट करुन त्याच्याकडील सोन्या-चांदीचे दागिने हिसकावल्याचे कबुल केले. या गुन्ह्यात त्यांनी आपल्या इतर साथीदारांची नावे कबुल केली. ताब्यातील तिघा गुन्हेगारांनी दिलेल्या माहितीनुसार विशाल देविदास मराठे (रा. रायपुर कंडारी ता. जळगाव), विनोद विश्वनाथ इंगळे (रा. उचंदा ता. मुक्ताईनगर) यांची नावे पुढे आली.
पोलिसांच्या ताब्यातील सुनिल जाधव याने दिलेल्या कबुलीनुसार त्याच्याकडून मुक्ताईनगर पोलिस स्टेशनला दाखल गुन्ह्यातील सोन्या चांदीच्या दागिन्यांच्या मुद्देमालासह गुन्ह्यात वापरलेल्या दोन मोटार सायकली जप्त करण्यात आल्या आहेत. गेल्या आठ ते नऊ महिन्यात पळासखेडा ते बोदवड, वराड ते विटनेर, लासगाव ते बांबरुड आणी वराड ते जळके अशा विविध मार्गावरील मोटार सायकलस्वारांची लुट केल्याची कबुली पोलिसांच्या ताब्यातील तिघा गुन्हेगारांनी दिली. आकाश दिलीप पवार, सुनिल मिश्रीलाल जाधव यांनी दिलेल्या कबुलीनुसार जामनेर, एमआयडीसी आणि पाचोरा पोलिस स्टेशनला दाखल चोरीचे विविध गुन्हे उघडकीस आले आहेत. या गुन्ह्यात त्यांच्या इतर साथीदारांची नावे देखील उघड झाली आहेत.
स्थानिक गुन्हे शाखेचे पो.नि. किसनराव नजनपाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उप निरीक्षक अमोल देवढे, गणेश चोबे, सहायक फौजदार रवी नरवाडे, अनिल जाधव, युनुस शेख, पोहेकॉ विजयसिंग पाटील, संजय हिवरकर, राजेश मेंढे, सुनिल दामोदरे, सुधाकर अंभोरे, जयंत चौधरी, अशरफ शेख, संदिप पाटील, दिपक पाटील, अक्रम शेख, महेश महाजन, संदिप सावळे, पोना किशोर राठोड, रणजित जाधव, नितीन बाविस्कर, प्रितमकुमार पाटील, विजय पाटील, संतोष मायकल, नंदलाल पाटील, भगवान पाटील, श्रीकृष्ण देशमुख, किरण धनगर, प्रमोद लाडवंजारी, रविंद्र पाटील, परेश महाजन, पोकॉ विनोद पाटील, ईश्वर पाटील, दिपक शिंदे, उमेश गोसावी, हे.कॉ. रमेश जाधव, राजेंद्र पवार, भारत पाटील, चापोना दर्शन ढाकणे, अशोक पाटील, मुरलीधर बारी, प्रमोद ठाकुर तसेच मुक्ताईनगर पो.स्टे. चे पोलिस उप निरीक्षक प्रदिप शेवाळे, पोहेकॉ गणेश मनोरे, पोना मोतीलाल बोरसे, धर्मेंद्र ठाकुर, पोकॉ राहुल महाजन, प्रशांत चौधरी, सतिष भारुडे, चापोना लतिफ तडवी आदींनी या तपासकामी सहभाग घेतला.