नंदुरबार : बांधकाम ठेकेदाराने सादर केलेल्या बिलाच्या रकमेच्या मोबदल्यात अडीच टक्के लाच मागणारा जि.प. उप विभागीय अभियंता बबन काशीराम जगदाळे ( नवापूर ) यास 85 हजाराची लाच घेतांन रंगेहाथ पकडण्यात लाच लुचपत अधिका-यांना यश आले. त्यास अटक करण्यात आली असून पुढील कारवाई सुरु आहे.
तक्रारदार बांधकाम ठेकेदाराने जिल्हा परिषद नंदुरबार अंतर्गत कामाचे बिल सादर केले होते. त्या बिलाची रक्कम 44 लाख त्यांना मिळाली होती. त्या बिलाच्या रकमेच्या मोबदल्यात अभियंता बबन जगदाळे यांनी अडीच टक्के लाच तक्रारदाराकडे एक लाख पाच हजार रुपयांची लाच मागीतली होती. त्यापैकी दोन दिवसांपुर्वी विस हजार रुपये अभियंता जगदाळे यांनी तक्रारदाराकडून घेतली होती. उर्वरित 85 हजाराची रक्कम घेतांना आज त्यांना लाच लुचपत विभागाच्या अधिकारी व कर्मचारी वर्गाने सापळा रचून त्यांना अटक केली.
सदर कारवाई नंदुरबार एसीबीचे पोलिस उप अधिक्षक शिरिष जाधव यांच्या अख्त्यारीत पो.नि. जयपाल अहिरराव, उत्तम महाजन, संजय गुमाणे, मनोहर बोरसे, दिपक चित्ते, संदिप नावडेकर मनोज अहिरे, अमोल मराठे व ज्योती पाटील यांनी या कारवाईत सहभाग घेतला.