जळगाव पोलिस वेल्फेअर आणि सामाजीक बांधीलकी

जळगाव (क्राईम दुनिया न्युज नेटवर्क) : जळगाव जिल्हा पोलिस दल संचलीत वेल्फेअर विभागाच्या माध्यमातून पोलिस अधिकारी – कर्मचा-यांसह सर्वसामान्य नागरिकांचे देखील हित  सामाजीक बांधीलकीच्या दृष्टिकोनातून जोपासले जात आहे. या विभागाच्या माध्यमातून विविध उपक्रम राबवले जात असून त्याचा पोलिस बांधवांसह सर्वसामान्य नागरिकांना देखील फायदा होत आहे. एरव्ही पोलिस दल म्हटले म्हणजे कायदा व सुव्यवस्था राबवणे हे एकमेव उद्धीष्ट सर्वसामान्य जनतेच्या नजरेसमोर येत असते. मात्र जळगाव पोलिस दलाच्या वेल्फेअर अर्थात मानव संसाधन विभागाच्या माध्यमातून विविध उपक्रम राबवले जात आहेत.

Ambadas More PI

पोलिस सबसिडीअरी कॅण्टीन, दक्षता पेट्रोल पंप, पोलिस जलतरण विभाग, पोलिस जिम्नॅशिअम, कराटे व स्केटींग, लॉन टेनिस/स्क्वॅश कोर्ट, इनडोअर फायरिंग रेंज, पोलिस मल्टीपर्पज हॉल/मंगलम हॉल, पोलिस वाचनालय, पोलिस बॉईज होस्टेल, पोलिस ऑफीसर्स क्लब, आयपी मेस, मुक्ताई गार्डन, पोलिस मल्टीस्पेशलिटी हॉस्पीटल असे अनेक उपक्रम वेल्फेअर विभागाच्या माध्यमातून राबवले जात आहेत. पोलिस निरीक्षक अंबादास मोरे यांच्यासह सहायक पोलिस निरीक्षिका सुनंदा पुंडलीक पाटील, सहायक फौजदार रावसाहेब लक्ष्मण गायकवाड, हे.कॉ. सतिष भिमराव देसले, पोलिस नाईक चंद्रसिंग पांडुरंग राजपूत, पो.कॉ. जितेंद्र मधुकर चौधरी आणि महिला पो.कॉ. अश्विनी प्रताप निकम यांच्यासह क्लार्क सुनिल बनकर अशी टीम या विभागाच्या दिमतीला कार्यरत आहे.

जळगाव पोलिस मल्टीपर्पज हॉल अर्थात बहुउद्देशीय सभागृहाच्या इमारतीचे उद्घाटन 16  ऑगस्ट 1983 रोजी झाले. पोलिस कल्याण निधीतून या मल्टीपर्पज हॉलचे बांधकाम करण्यात आलेल्या या हॉलच्या देखरेखकामी पोलिस नाईक युसुफ पिंजारी यांची नेमणूक करण्यात आली आहे. पोलिस अधिकारी व कर्मचारी यांच्यासह सर्वसामान्य जनतेसाठी देखील हे  सभागृह घरगुती, लग्नसोहळा तसेच विविध सांस्कृतीक कार्यक्रमांसाठी भाड्याने दिले जाते. 1 जानेवारी 2018 पासून या  हॉलचे सुधारीत भाडे निश्चित करण्यात आले आहे. पोलिस अधिकारी अथवा कर्मचा-यांच्या परिवारिक कार्यक्रमासाठी या  हॉलचे भाडे 11 हजार रुपये प्रति दिवस याप्रमाणे आकारले जाते. सर्वसामान्य व्यक्तींसाठी या हॉलचे भाडे 21  हजार रुपये प्रति दिवस याप्रमाणे आकारले जाते. या रकमेत सेवाकर, विज बिल व डिपॉजीट एक  हजार रुपये आदींचा समावेश असतो.  

पोलिस मल्टीपर्पज हॉल पेक्षा क्षमतेने आणि आकाराने मोठा असलेला मंगलम हॉल 1 मे  2017 रोजी पासून सुरु करण्यात आला आहे. पोलिस मुख्यालय आवारात असलेला हा  हॉल  सुसज्ज स्थितीत असून वातानुकुलीत आहे. सध्या या  हॉलचा वापर पोलिसांची कार्यशाळा, शासकीय कार्यक्रम, क्राईम मिटींग व इतर कार्यक्रमांसाठी केला जात आहे. बंदोबस्तकामी बाहेरुन येणा-या पोलिस अधिकारी व कर्मचारी वर्गाची या हॉलच्या वरील मजल्यावर निवास व्यवस्था उपलब्ध करुन दिली जाते. पोलिस अधिकारी अथवा कर्मचा-यांच्या परिवारासाठी लग्न कार्यासाठी मंगलम हॉल हवा असल्यास 20  हजार रुपये प्रति दिवस याप्रमाणे भाडे आकारले जाते. इतरांसाठी प्रति दिवस 40  हजार रुपये भाड्याची आकारणी केली जाते. कोरोना कालावधीत लग्नकार्य लांबणीवर पडल्यामुळे मोठ्या प्रमाणात आर्थिक नुकसान झाल्याचे कारकुन सुनिल बनकर यांनी क्राईम दुनियासोबत बोलतांना कथन केले. याशिवाय एमआयडीसी पोलिस स्टेशनच्या मागील मोकळी जागा देखील भाड्याने दिली जाते. या जागेचे एका  दिवसासाठी 50 हजार रुपये भाडे आकारणी केली जाते.

स्केटींग व कराटेचे प्रशिक्षण मुलांना लहानपणापासून मिळावे, त्यांच्यात स्व-सरंक्षणाचा आत्मविश्वास निर्माण व्हावा या  उद्देशाने जळगाव पोलिस दलाने पुढाकार घेतला आहे. नवीन बस स्थानकानजीक चिमुकले राम मंदीराशेजारी पोलिस दलाच्या भव्य जागेत कराटे, स्केटींग आणि किड्स क्लबची स्थापना करण्यात आली आहे. 5 जुलै 2002 पासून पोलिस कल्याण  केंद्रामार्फत कराटे क्लासची सुरुवात करण्यात आली आहे. महिला पोलिस शिपाई अश्विनी प्रताप निकम यांच्याकडे कराटे प्रशिक्षण देण्याची तर  जागृती काळे यांच्याकडे  स्केटींगचे प्रशिक्षण देण्याची जबाबदारी निश्चीत करण्यात आली आहे. 1 नोव्हेंबर 2022 पासून या  क्लासेसचे सुधारीत दर  निश्चीत करण्यात आले आहे. पोलिस  पाल्यांसाठी प्रती खेळ पाचशे रुपये दरमहा आणि  बाहेरील खेळाडूंसाठी प्रतीखेळ आठशे रुपये  दरमहा अशी  फी  निश्चित  करण्यात आली आहे. पोलिस पाल्यांसाठी प्रवेश फी प्रती वर्षासाठी दोनशे रुपये आणि  बाहेरील खेळांडूसाठी दोन्ही खेळांसाठी पाचशे रुपये निश्चीत करण्यात आली आहे. रवीवार सुटीचा दिवस वगळता सोमवार ते शनीवार कराटे व स्केटींगचे प्रशिक्षण या मैदानावर दिले जाते. सकाळी 6 ते 8 आणि  सायंकाळी चार  ते  सात  दरम्यान स्केटींगसह कराटेचे प्रशिक्षण देण्यात येते.

पोलिस कल्याण अंतर्गत घेतल्या जाणा-या  विविध कार्यक्रमांसाठी दुरगामी किफायतशीर परिणामाच्या दृष्टीने फुटबॉल मैदानावर 80 बाय  50  फुट  आकाराचे खुले मंच तयार करण्यात आले आहे. या खुल्या मंचाचा वापर 18 जानेवारी 2017 पासून कार्यक्रमांसाठी उपलब्ध करुन देण्यात आला आहे. 1 जानेवारी 2019 पासून नव्याने दर  यासाठी निश्चीत करण्यात आले  आहे. पोलिस अधिकारी व कर्मचारी वर्गाच्या कुटूंबासाठी 20  हजार आणी  बाहेरील व्यक्तींसाठी चाळीस हजार असा दर  निश्चित करण्यात आला आहे.

पोलिस मुख्यालय येथे पोलिस कल्याण निधी अंतर्गत बास्केट बॉल मैदानाचे सन 2020 मधे नुतनीकरण करण्यात आले आहे. बास्केट बॉल उपक्रमाचे 1 ऑक्टोबर 2022 पासून नव्याने दर निश्चीत करण्यात आले आहे. पोलिस अधिकारी व अंमलदार यांना कोणतेही शुल्क आकारले जात नाही. पोलिस पाल्यांसाठी प्रवेश नोंदणी फी पाचशे रुपये व दरमहा शुल्क तिनशे अशी आकारणी केली जाते. बाहेरील नागरिकांसाठी प्रवेश फी पाचशे आणि दरमहा शुल्क पाचशे अशी आकारणी केली जाते.  

पोलिस अधिकारी, कर्मचारी व त्यांच्या पाल्यांसाठी पोलिस मुख्यालय येथे टेनीस कोर्ट 19 जानेवारी 2003 पासून तर स्क्वॅश कोर्ट 3 जून 2004 पासून सुरु करण्यात आले आहे. पोलिस अधिकारी, कर्मचारी व त्यांचे पाल्य यांच्यासाठी दरमहा तिनशे रुपये आणि इतर  व्यक्तींसाठी दरमहा 750  रुपये फी निश्चीत करण्यात आली आहे. सद्यस्थितीत केवळ पोलिस अधिकारी या कोर्टचा वापर करतात.  

जिम्नॅशिअम हॉल (व्यायाम शाळा) 2 सप्टेबर 2003 पासून पोलिस कल्याण केंद्रामार्फत सुरु करण्यात आला  आहे. 1 जानेवारी 2019 पासून या हॉलमधे व्यायाम करण्यासाठी नव्याने दर निश्चीत करण्यात आले आहे. पोलिस अधिकारी व कर्मचारी तसेच त्यांचे पाल्य यांना प्रवेश फी नसून दरमहा दोनशे रुपये फी आकारली जाते. इतर व्यक्तींसाठी प्रवेश फी  दोनशे रुपये आणि दरमहा पाचशे रुपये फी आकारली जाते. धनराज गुळवे हे  या व्यायाम शाळेचे प्रशिक्षक आहेत.

पोलिस जलतरण तलाव हा  पोलिस मुख्यालय येथे ऑफीसर्स मेसच्या मागील बाजूस आहे. या जलतरण तलावाच्या देखभालीसह प्रशिक्षक म्हणून हे.कॉ. कमलेश भालचंद्र नगरकर यांची नियुक्ती करण्यात आली  आहे. जलतरण तलाव दर  सोमवारी साफसफाईसाठी बंद  ठेवण्यात येतो. सकाळी 6 ते  10  आणि सायंकाळी 4 ते 9 अशी  वेळ या तलावासाठी ठरवण्यात आली आहे. 1 एप्रिल 2022 पासून या जलतरण तलावात पोहण्यासाठी नव्याने दर  निश्चीत करण्यात आले आहे. पोलिस अधिकारी, कर्मचारी वर्गासाठी दरमहा पाचशे रुपये, खेळाडूंसाठी सातशे आणि बाहेरील व्यक्तींसह इतर सरकारी कर्मचा-यांसाठी एक हजार रुपये शुल्क आकारणी केली जाते. याशिवाय नोंदणी फी दोनशे रुपये सर्वांकडून आकारले जातात. 25 मिटर लांबी आणि 125  मिटर रुंदी असलेला हा जलतरण तलाव आहे. सन 2021 मधे पोलिस पाल्य अमेय नगरकर याने पहिला नॅशनल नामांकन जलतरणपटू म्हणून जळगाव पोलिस दलाचे नाव उज्वल केले आहे. याच जलतरण तलावाचा खेळाडू आणि पोलिस पाल्य अमेय नगरकर हा प्रशिक्षक कमलेश नगरकर यांचा पाल्य आहे. त्याने वॉटर पोलो या  खेळात सिल्व्हर मेडल मिळवले आहे. प्रशिक्षक कमलेश नगरकर यांनी क्राईम दुनियासोबत बोलतांना ही  माहिती दिली आहे. जळगाव पोलिस दल संचलीत दक्षता पेट्रोल पंप सर्वांसाठी खुला आहे. लॉन टेनिस – स्क्वॅश कोर्ट, पोलिस ऑफीसर्स क्लब आणि आयपी मेसचा वापर केवळ पोलिस अधिकारी वर्गासाठी आहे. इनडोअर फायरिंग रेंजचा उपयोग सर्व पोलिस कर्मचारी बांधवांसाठी आहे. याशिवाय पोलिस सबसिडिअरी कॅन्टीन, पोलिस वाचनालय, पोलिस बॉईज होस्टेलचा उपयोग केवळ पोलिसांसाठी आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here