गुरे चोरी करणा-या तिघांना जळगाव एलसीबीने केले जेरबंद

जळगाव : गुरे चोरी करणा-या तिघांना स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने जेरबंद केले असून त्यांच्या इतर  साथीदारांचा शोध सुरु आहे. गुरे चोरीप्रकरणी सात जणांची नावे निष्पन्न झाली असून त्यातील तिघे पोलिसांच्या ताब्यात आहेत. मोहमंद फयाज मोहमंद अयाज रा. कसाईवाडा पाळधी ता. धरणगाव, वसीम मोहमंद अस्लम कुरेशी रा. नया फरहान हॉस्पीटल जकरिया मस्जीद मालेगांव ह.मु.  मासुमवाडी जळगाव आणि नईम शेख कलीम रा. मासुमवाडी, जळगाव अशी अटक करण्यात आलेल्या तिघांची नावे आहेत. पोलिस अधिक्षक एम. राजकुमार यांनी आज घेतलेल्या पत्रकार परिषदेत सविस्तर माहिती दिली.

पाळधी येथील कसाईवाड्यातील रहिवासी मोहमंद फयाज मोहम्मद अयाज हा गुरे चोरी करणारा मुख्य आरोपी असल्याची माहिती स्थानिक गुन्हे शाखेचे पो.नि. किसनराव नजनपाटील यांना समजली होती. त्या माहितीच्या आधारे डीबी कर्मचा-यांच्या मदतीने मोहंमद फयाज यास त्याच्या ताब्यातील स्कॉर्पिओ वाहनासह जळगाव शहरातील अजिंठा चौफुली परिसरातून अटक  करण्यात आली.

अटकेतील मोहंमद फयाज याने दिलेल्या माहितीनुसार वसीम मोहमंद अस्लम कुरेशी रा. नया फरहान हॉस्पीटल जकरिया मस्जीद जळगाव, नईम शेख कलीम रा मासुमवाडी, जळगाव, जाफर गुलाब नबी रा. कसाईवाडी पाळधी ता धरणगाव, हारुन ऊर्फ बाली शहा रा. बारापत्थर जवळ धुळे, अरशद रा.बारापत्थर जवळ धुळे आणि मनोज ऊर्फ मोन्या विठ्ठल पाटील रा. सुरेशदादा नगर कुसुंबा ता. जळगाव आदींच्या मदतीने गुरे चोरीचे विविध गुन्हे उघड झाले आहेत. अटकेतील मोहंमद फयाज याच्यासह वसीम मोहमंद अस्लम कुरेशी आणि नईम शेख कलीम या तिघांना अटक करण्यात आली आहे. इतर फरार आरोपींचा शोध सुरु आहे. या टोळीने कबुल केल्याप्रमाणे जामनेर, भडगाव, अमळनेर, एरंडोल, पारोळा, चोपडा, जळगाव तालुका, मुक्ताईनगर आणि पाचोरा अशा पोलिस स्टेशन हद्दीत एकुण 19 गुन्हे उघदकीस आले आहेत. अटकेतील तिघांसह त्यांनी गुन्ह्यात वापरलेले दोन स्कॉर्पिओ वाहने जप्त करण्यात आली आहेत.

स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक किसनराव नजनपाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उप निरीक्षक गणेश चौबे, सफौ रवि नरवाडे, युनूस शेख, पोहेकॉ संजय हिवरकर, पोहेकॉ राजेश मेंढे, पोहेकॉ अशरफ शेख, पोहेकॉ संदीप सावळे, पोहेकॉ संदीप पाटील, पोहेकॉ सुनिल दामोदर, पोहेकॉ  अकरम शेख, पोहेकॉ महेश महाजन, पोना संतोष मायकल, नंदलाल पाटील, भगवान पाटील, हेमंत पाटील, पोकॉ ईश्वर पाटील, पोकॉ उमेश गोसावी, हेमंत पाटील, लोकेश माळी, चापोहेकॉ भारत पाटील, चापोकॉ दर्शन ढाकणे, अशोक पाटील आदींनी या  गुन्ह्याच्या तपासकामी सहभाग घेतला. पत्रकार परिषदेत माहिती देतांना पोलिस अधिक्षक एम. राजकुमार यांच्यासमवेत अप्पर पोलिस अधिक्षक चंद्रकांत गवळी, स्थानिक गुन्हे शाखेचे पो.नि. किसनराव नजनपाटील, जामनेरचे पोलिस निरीक्षक किरण शिंदे आदी अधिकारी हजर होते. अटकेतील तिघांना पुढील कारवईकामी जामनेर पोलिस स्टेशनच्या ताब्यात देण्यात आले आहे. पो. नि. किरण शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली सपोनि दिलीप राठोड पुढील तपास करत आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here