सकल मराठा भव्य वधुवर मेळाव्याचे जळगावला आयोजन

जळगाव : सकल मराठा सोयरीक खान्देश गृप संस्थेने रविवार दिनांक 25 डिसेंबर 2022 रोजी जळगांव शहरात सकल मराठा वधुवर परिचय मेळाव्याचे आयोजन केले आहे. या मेळाव्याला मराठा समाज बांधवांनी भेट देण्याचे आवाहन सोयरीक गृपचे मार्गदर्शक व जिल्हा अध्यक्ष संजय रामचंद्र पवार यांनी केले आहे. 25 डिसेंबर 2022 रोजी सकाळी 9.00 वाजता जळगांव शहरातील साईलीला हॉल आणि लॉन्स, गुंजन मंगल कार्यालयाच्या बाजुला पाचोरा रोड जळगांव या ठिकाणी हा  मेळावा आयोजीत करण्यात आला  आहे. खान्देश विभागातील सर्व जिल्हयांचा या वधू वर  थेट  भेट  मेळाव्यात सहभाग राहणार आहे.

महाराष्ट्रातील विविध जिल्हयातील व तालुक्यातील मराठा व उप जातींची सर्व स्थळे या मेळाव्यात बघण्यास मिळणार आहेत. स्वतः वधु-वरांनी व पालकांनी हजर राहणे गरजेचे असल्याची माहिती आयोजक जयकिशन वाघेपाटील, सौ. रजणीताई गोंदेकर, राज्य अध्यक्ष यांनी केले आहे. या मेळाव्यात मराठा समाजातील विधवा, विधूर, घटस्फोटीत स्थळे देखील बघण्यास मिळणार आहेत.

मेळाव्याचा लाभ घेण्यासाठी नावनोंदणीसाठी सकल मराठा सोयरीक गृप कार्यालय सूर्यकिरण अपार्टमेंट प्लॉट नं. 16 प्लॅट क्रमांक जी-1 मोहाडी फाटा आदर्श नगर जळगांव, मोबाईल नं. 98236 36372 या क्रमांकावर संपर्क साधण्याचे आवाहन देखील आयोजकांच्या वतीने करण्यात आले आहे. या मेळाव्यासाठी नाममात्र शुल्क आकारण्यात येणार आहे. या मेळाव्यात 96 कुळी मराठा, कुणबी मराठा, देशमुख मराठा, पाटील मराठा इत्यादी उप जातीच्या विवाह इच्छुक वधुवरांची नोंदणी केली जाणार आहे. मेळाव्यानंतर महिनाभरात सर्वांना वधू  वर  पुस्तिकेचे वितरण केले जाणार आहे.

मेळाव्यास्थळी नांव नोंदणी फॉर्म भरुन देण्यासाठी सोबत 2 पासपोर्ट फोटासह आधारकार्ड, झेरॉक्स सोबत ठेवावी. त्यानंतर वधुवरांचे सपर्क नंबर लिहून घेण्यासाठी एक वही व पेन सोबत ठेवण्याचे आवाहन आयोजक  प्रा. पी. के. चौधरी, प्रा. आय. एन. अहिरराव. प्रा. एस.डी. थोरात, एस.सी. पाटील, डी. डी. वाघ, अनंत जाधव धरणगांव, शांताराम एस. पाटील, सौ. जयश्रीताई रणदिवे चाळीसगांव., गणेश पाटील यांच्या सह विविध मराठा संघटनेच्या पदाधिका-यांनी केले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here