जळगाव : नववर्षाच्या स्वागतानिमीत्त गर्दीचा गैरफायदा घेत मोबाईल चोरी करणा-या दोघा परप्रांतीय मोबाईल चोरट्यांना जळगाव शहर पोलिसांच्या गुन्हे शोध पथकाने अटक केली आहे. सर्वजीत कुमार अर्जुन महंतो आणि सनीकुमार महेंदर नोणीया (दोघे रा.नया टोला कल्यानी महाराजपुर बाजार ता.तालझारी जि.साहेबगंज झारखंड) अशी अटक करण्यात आलेल्या मोबाईल चोरट्यांची नावे आहेत.
अटकेतील दोघांच्या कब्जातून 65 हजार रुपये किमतीचे वेगवेगळ्या कंपनीचे एकुण सहा मोबाईल हस्तगत करण्यात आले आहेत. त्या मोबाईलपैकी एक मोबाईल चोरीचा गुन्हा जळगाव शहर पोलिस स्टेशनला दाखल आहे. तो गुन्हा उघडकीस आला आहे.
पोलीस निरीक्षक विजयकुमार ठाकुरवाड यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उप निरीक्षक दत्तात्रय पोटे, पोहेकॉ विजय निकुंभ, पोहेकॉ भास्कर ठाकरे, पोहेकॉ उमेश भांडारकर, पोना योगेश पाटील, पोना गजानन बडगुजर, पोकॉ तेजस मराठे, रतन गिते, पोकॉ अमोल ठाकुर, योगेश इंधाटे आदींनी या कारवाईत सहभाग घेतला. पुढील तपास पोलिस नाईक गजानन बडगुजर करत आहेत.