पोलीस पाटलाने केला महिलेवर अत्याचार

On: August 15, 2020 10:55 PM

मूर्तिजापूर : तालुक्यातील एका गावच्या पोलीस पाटलाने शेजारच्या गावातील महिलेचा विनयभंग केल्याची घटना घडली. पोलिस पाटील याने तिच्यावर अतिप्रसंग देखील केल्याची घृणास्पद घटना पिडीत महिलेने पोलिस स्टेशनला दिलेल्या तक्रारीच्या माध्यमातून उघड झाली आहे.

मंगरूळ कांबे या गावचे पोलीस पाटील दिनेश वाकोडे याने महिलेचा विनयभंग केला असल्याचा आरोप आहे. त्या महिलेवर बलात्कार केल्याचा देखील आरोप महिलेने केला आहे. या प्रकरणी पिडीत महिलेने १३ ऑगष्ट रोजी रात्री उशिरा मूर्तिजापूर ग्रामीण पोलीस स्टेशनला तक्रार दाखल केली.

महिलेने दिलेल्या तक्रारीनुसार संशयीत आरोपी पोलीस पाटील दिनेश वाकोडे याने गेल्या २० जुलैच्या रात्री महिलेच्या घराचे दार ठोठावले. महिला घरातून बाहेर येताच त्याने तिचा हात धरुन तिचा विनयभंग केला. त्यापूर्वी १२ जुलैच्या रात्री संशयीत आरोपीने तिच्यावर अतिप्रसंग केल्याचे तक्रारीत नमुद करण्यात आले आहे.
सदर घटनेबाबत कुठे वाच्यता केल्यास मारुन टाकण्याची धमकी दिल्याचे म्हटले आहे. ग्रामीण पोलीसांनी संशयीत आरोपीविरुद्ध भा.द.वि.कलम ३७६, ३५४, ५०४, ५०६ नुसार गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास सुरु आहे.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

Leave a Comment