प्राणघातक हल्ल्यातील पंधरा वर्षापासून फरार आरोपीस अटक 

जळगाव : प्राणघातक हल्ल्यात जिल्हापेठ पोलिसांना हवा असलेला पंधरा वर्षापासून फरार आरोपीस स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने अटक केली आहे. संजय भास्कर पाटील रा. दिक्षीतवाडी जळगाव असे अटकेतील आरोपीचे नाव आहे. पियुष नरेंद्र पाटील, संजय भास्कर पाटील (दोघे रा. दिक्षीतवाडी जळगाव), बाळु चव्हाण (रा. कानळदा ता.जि. जळगाव), भूषण पाटील आणि चंद्रकांत पाटील अशा पाच जणांविरुद्ध जळगाव जिल्हापेठ पोलिस स्टेशनला सन 2018 मधे प्राणघातक हल्ल्यासह विविध कलमाखाली गुन्हा दाखल करण्यात आला होता.

19 जून  2018 रोजी गुन्हा दाखल झाल्यानंतर पाचही जण अटक चुकवत होते. या पाच जणांपैकी संजय भास्कर पाटील हा जळगाव शहरात वावरत असल्याची गोपनीय माहिती स्थानिक गुन्हे शाखेचे पो.नि. किसनराव नजनपाटील यांना समजली होती. त्या माहितीच्या आधारे त्याला त्याच्या राहत्या घरातून अटक करण्यात आली.

पो.नि. किसनराव नजनपाटील यांच्या पथकातील सहायक फौजदार अनिल जाधव, रवि नरवाडे, पोहेकॉ संजय हिरवरकर, विजयसिंग पाटील, राजेश मेंढे, गोरख बागुल, अक्रम शेख, पोना संतोष मायकल, विजय पाटील, पोकॉ सचिन महाजन, ईश्वर पाटील, महिला हे.कॉ. रत्ना मराठे, अभिलाषा मनोरे, मपोना वैशाली सोनवणे, ज्योती पाटील आदींसह जिल्हापेठ पोलिस स्टेशनचे स.पो.नि. किशोर पवार यांच्यासह पोहेकॉ  सलीम तडवी, पोहेकॉ गणेश पाटील, पोना विकास पोहरकर, पोना युनूस तडवी, पोकॉ. समाधान पाटील आदींनी या कारवाईत सहभाग घेतला.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here