नाशिक विभागीय तायक्वांडो क्रीडा स्पर्धेत जळगाव जिल्हा तायक्वांडो असोसिएशनच्या खेळाडूंचे वर्चस्व

जळगाव दि.25 प्रतिनिधी –  नाशिक विभागीय शालेय तायक्वांडो क्रीडा स्पर्धांमध्ये १४,व १७ आणि १९ वर्ष वयोगटातील मुलांमध्ये जळगाव जिल्हा तायक्वांडो असोसिएशनच्या खेळाडूंनी वर्चस्व निर्माण करीत १६ सुवर्ण, ४ रौप्य,६ कांस्यपदकांची लयलूट केली. धुळे येथे सुरू असलेल्या नाशिक विभागीय शालेय तायक्वांडो मुलांच्या काल झालेल्या स्पर्धेत १४ वर्षांखालील १८ ते २१ किलो  शिवम् पाटील,( माॅडर्न इंग्लिश स्कूल,रावेर), २१ ते २३ किलो साई शेलार ( आचार्य जी आर गरूड माध्य विद्यालय, शेंदुर्णी ), २३ ते २५ किलो सिद्धार्थ कुमावत ( आचार्य जी आर गरूड माध्य विद्यालय शेंदुर्णी ),२७ ते २९ किलो ओम गोंधळी ( आचार्य जी आर गरूड माध्य विद्यालय, शेंदुर्णी ) यांनी सुवर्ण पदक पटकावले.

२९ ते ३२ साई भोई ( गुरुकुल इंग्लिश मिडीयम स्कूल, शेंदुर्णी), ३८ ते ४१ किलो साई निळे ( सरस्वती विद्या मंदिर, रावेर ) ४१ किलो वरील फरहान पठाण (सावित्रीबाई फुले माध्यमिक, पहूर) यांनी कांस्यपदक पटकावले, १७ वर्ष मुलांमध्ये ३५ ते ३८ किलो भावेश चौधरी (आचार्य जी आर गरूड माध्य विद्यालय,शेंदुर्णी) ३८ ते ४१ किलो दानिश तडवी (माॅडर्न इंग्लिश स्कूल, रावेर) ४१ते ४५ सिद्धांत घेटे (स्वामी विवेकानंद विद्यामंदिर, रावेर) ५१ ते ५५ किलो लोकेश महाजन (स्वामी विवेकानंद विद्यामंदिर, रावेर), ५९ ते ६३ दिनेश चौधरी (सरदार जी जी हायस्कूल, रावेर), ७८ वरील ऋतिक कोतकर (छत्रपती शिवाजी महाराज, महाविद्यालय, जळगांव) यांनी सुवर्ण पदक पटकावले आहे.

५५ ते ५९ किलो प्रविण खरे (शिंदे इंटरनॅशनल स्कूल, पाचोरा ), ७३ ते ७८ किलो जयदीप परदेशी ( न्यु बु-हानी इंग्लिश स्कूल, पाचोरा) यांनी रौप्य पदक पटकावले तर सतिश क्षिरसागर, अनिरुद्ध महाजन, ललित महाजन यांनी कांस्यपदक पटकावले १९ वर्ष मुलांमध्ये ४५ ते ४८ श्रीकांत महाजन ( सरदार जी जी हायस्कूल रावेर ), ४८ ते ५१ प्रबुद्ध तायडे ( स्वामी विवेकानंद विद्यामंदिर, रावेर ), ६३ ते ६८ नरेश पाटील ( सरदार जी जी हायस्कूल, रावेर), ७८ किलो वरील हेमंत गायकवाड ( सरदार जी जी हायस्कूल, रावेर ) ५९ ते ६३ अथर्व कुलकर्णी ( रावेर) याने रौप्य पदक पटकावले. खेळाडूंना जयेश बाविस्कर, जयेश कासार,जिवन महाजन, श्रीकृष्ण देवतवाल, श्रीकृष्ण चौधरी, सुनील मोरे, हरीभाऊ राऊत यांचे प्रमुख मार्गदर्शन लाभले आहे सुवर्ण पदक विजेता खेळाडूंची पुढील महिन्यात जळगांव येथे होणाऱ्या शालेय राज्यस्तरीय तायक्वांडो स्पर्धेसाठी निवड झाली आहे. विजेत्यांना संघटनेचे अध्यक्ष अतुल जैन, ललित पाटील, सचिव अजित घारगे, सुरेश खैरनार, रवींद्र धर्माधिकारी, सौरभ चौबे, महेश घारगे, कृष्णकुमार तायडे, अरविंद देशपांडे, यांनी कौतुक करीत पुढील स्पर्धेसाठी शुभेच्छा दिल्या आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here