नवी दिल्ली : सोन्याच्या किंमतीत सध्या घसरण झाली आहे. त्यामुळे साहजीकच कमी किमतीत सोन्याची खरेदी करण्याकडे लोकांचा कल जावू शकतो. मात्र जुने सोने विकण्यासाठी जात असाल तर मात्र त्यावर देखील जीएसटी लागू शकतो. वृत्त संस्था पीटीआयने दिलेल्या माहितीनुसार जुने सोने आणि दागिने विक्रीवर जीएसटी आकारला जाण्याची शक्यता आहे. केरळचे अर्थमंत्री थॉमस आयसॅक यांनी काही दिवसांपुर्वी दिलेल्या माहितीनुसार राज्यांच्या अर्थमंत्र्यांचा समुहात जुने सोने आणि दागिन्यांच्या विक्रीवर तीन टक्के जीएसटी आकारण्याच्या प्रस्तावाला जवळपास मंजूरी मिळाली आहे.
बाजारात सोन्याची किंमत आणि दागिन्याचे वजन अलग अलग असते. खरेदीनंतर त्याची किंमत व मजूरीवर 3 टक्के जीएसटी आकारला जातो. तुम्ही कोणत्याही प्रकारे दागिन्यांची किंमत दिली तरी त्यावर तुम्हाला जीएसटी द्यावा लागतो.
खुप कमी लोकांना माहित असते की सोन्याच्या खरेदीप्रमाणेच विक्रीवर देखील कर द्यावा लागतो. तुमच्याकडे असलेला दागीना किती जुना आहे याची पडताळणी केली जाते. त्या कालावधीनुसार शॉर्ट टर्म आणी लॉंग टर्म कॅपीटल गेन कर द्यावा लागतो. सोने खरेदीच्या तारखेनंतर ते तिन वर्षाच्या आत विकतांना त्यावर शॉर्ट टर्म कॅपीटल गेन कर द्यावा लागतो. विकलेल्या दागीन्याच्या मिळणा-या रकमेतून आयकर स्लॅबनुसार कर कपात केली जाते. तीन वर्षाहून जास्त जुना दागीना विकल्यास लॉंग टर्म कॅपीटल गेन कर द्यावा लागतो.