जळगाव दि. ३० (प्रतिनिधी) – राष्ट्रपिता महात्मा गांधी यांना ७५ व्या पुण्यतिथी निमित्त जैन इरिगेशनच्या सर्व आस्थापनांमध्ये अभिवादन करून श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. गांधीजींनी दिलेला अहिंसेचा संदेश प्रत्येकाच्या मनात आहे.
त्यांच्या पुण्यतिथीनिमित्त हुतात्मा दिन ही पाळला जातो. स्वदेशी आणि स्वावलंबनाचा मार्ग स्वीकारुन देशाला आत्मनिर्भर करण्याची प्रेरणा देणाऱ्या महात्मा गांधीजींच्या जीवन चरित्राचा तरुणांना, येणाऱ्या पिढीला अभ्यास करता यावा यासाठी श्रद्धेय मोठेभाऊ भवरलालजी जैन यांनी गांधीतीर्थची निर्मिती केली. गांधी स्मृतिदिनी जैन इरिगेशनच्या सहकाऱ्यांनी त्यांना अभिवादन केले. स्वातंत्र्याच्या अमृत वर्षाच्या काळात ग्रामीण विकास, स्वच्छता स्वदेशी, आणि स्वभाषा हे विचार रुजणे महत्त्वाचे ठरते. कंपनीच्या मुख्यालयासह भारतातील सर्व कार्यालयांमध्ये सकाळी ११.०० वाजता आणि सायंकाळी ५.१७ वाजता सर्व सहकाऱ्यांनी स्तब्ध उभे राहून राष्ट्रपिता महात्मा गांधीजी यांना श्रद्धांजली अर्पण केली.