पत्रकार हत्येप्रकरणी एरंडोल तालुका पत्रकार संघातर्फे निवेदन

जळगव (एरंडोल) : राजापूर येथील महानगरी टाईम्सचे पत्रकार शशिकांत वारीशे यांच्या हत्येचा एरंडोल तालुका पत्रकार संघातर्फे १३ फेब्रुवारी २०२३ रोजी तिव्र निषेध करण्यात आला. याप्रकरणी तहसीलदारांना निवेदन देण्यात आले. तत्पुर्वी पत्रकार संघाच्या कार्यालयात शोकसभा घेण्यात आली. या सभेच्या अध्यक्षस्थानी जळगाव जिल्हा पत्रकार संघाचे कार्याध्यक्ष प्रमोद पाटील उपस्थित होते. याप्रसंगी संघाचे तालुकाध्यक्ष बी.एस.चौधरी, किशोर मोराणकर, प्रविण महाजन, प्रमोद चौधरी आदी पत्रकार बांधवांनी आपल्या शोकभावना व्यक्त केल्या. त्यानंतर एरंडोल तहसिलदार सुचिता चव्हाण यांना निवेदन देण्यात आले.

निवेदन देतांना पत्रकार संघाचे कार्याध्यक्ष प्रमोद पाटील, तालुकाध्यक्ष बी.एस.चौधरी, कार्याध्यक्ष शैलेश चौधरी, कैलास महाजन, कासोदा येथील पत्रकार अब्दुल हक अब्दुल देशमुख, रोहीदास पाटील, चंद्रभान पाटील, प्रविण महाजन, नितिन ठक्कर, राजधर महाजन, संजय बागड, किशोर मोराणकर, पंकज महाजन, उमेश महाजन, नितिन पाटील, देविदास सोनवणे, प्रमोद चौधरी आदी पदाधिकारी उपस्थित होते.

घडलेला प्रकार हा घातपाताचा असून संशयीत आरोपी पंढरीनाथ आंबेकर याच्या विरोधात बातमी दिल्याने दुखावल्यामुळे हा अपघात नसून आंबेकर यानेच हा घातपात घडवुन आणला आहे असा आरोप निवेदनात करण्यात आला आहे. समस्त पत्रकार बांधव या घटनेचा तिव्र निषेध करत असून पत्रकार संरक्षण कायद्यानुसार या प्रकरणी गुन्हा दाखल होऊन या खटल्याची सुनावणी जलदगती न्यायालयात व्हावी व वारीशे यांच्या कुटुंबियांना तसेच राज्यभरातील पत्रकारांना न्याय मिळावा अशी अपेक्षा व्यक्त करण्यात आली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here