जळगाव : घरफोडी करणा-या तिघा सराईत गुन्हेगारांना जळगाव स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने आज धरणगाव शहरातून अटक केली आहे. गजानन सोपान शिंगाडे (रा. पाचन वडगाव ता. जि. जालना), करतारसिंग गुरुमुखसिंग जुनी (रा. सरकारी दवाखान्याच्या मागे धरणगाव, बलदेवसिंग बापूसिंग जुनी (रा. सरकारी दवाखानाच्या मागे, धरणगाव) अशी अटकेतील तिघांची नावे आहेत. धरणगाव शहरात पाठलाग करुन तिघांना पकडण्यात पोलिस पथकला यश आले आहे.
तिघांनी दिलेल्या कबुलीनुसार जामनेर तालुक्यातील फत्तेपुर आणि वाकडी या गावातील ज्वेलरी शॉप आणि इतर दुकाने फोडून त्यातील रोख रक्कम आणि दागिने चोरी केली आहे. याशिवाय धरणगाव येथून एक पिकअप चारचाकी वाहन देखील चोरी केल्याचे अटकेतील तिघांनी कबुल केले आहे. पहुर व धरणगाव पोलिस स्टेशनला दाखल चोरी, घरफोडीचे गुन्हे उघडकीस आले आहेत. पहूर पोलीस स्टेशनला गु.र.नं. 31/23 भादंवि 461, 380 प्रमाणे 9 फेब्रुवारी 2023 रोजी गुन्हा दाखल आहे. ज्वेलरी दुकानाच्या शटरला कुलुप लावण्याच्या पट्ट्या कापून दुकानातून 45 हजर रुपयांचे सोने चांदीचे दागिने, बेनटेक्सचे दागिने चोरी झाल्याचा गुन्हा दाखल आहे.
या घटनेसह विविध जिल्ह्यात चो-या घरफोड्या करणारा अट्टल गुन्हेगार गजानन सोपान शिंगाळे हा धरणगाव शहरात आला असल्याची गोपनीय माहिती स्थानिक गुन्हे शाखेचे पो.नि. किसनराव नजनपाटील यांना समजली होती. त्या माहितीच्या आधारे त्यांनी आपले सहकारी पोलिस उप निरीक्षक अमोल देवढे, पोहेकॉ विजयसिंग धनसिंग पाटील, सुधाकर रामदास अंभोरे, संदिप रमेश पाटील, अशरफ शेख निजामोद्दीन, सुनिल पंडीत दामोदरे, पोना प्रविण जनार्दन मांडोळे, रविंद्र रमेश पाटील, अविनाश बापुराव देवरे, पोकॉ दिपककुमार फुलचंद शिंदे, चापोकॉ प्रमोद शिवाजी ठाकुर आदींच्या पथकाने धरणगाव शहरात जावून त्याचा शोध घेतला. त्यांच्या मदतीला धरणगाव पोलिस स्टेशनचे पो.नि. राहुल खताळ यांचे सहकारी पोना मिलींद अशोक सोनार, पोकॉ. वैभव गोकुळ बाविस्कर आदी होते. पोलिस पथक आपल्या मागावर असल्याचा सुगावा लागल्याने अट्टल गुन्हेगार गजानन सोपान शिंगाळे हा पलायन करु लागला. मात्र पोलिस पथकाने पाठलाग करुन त्याला शिताफीने ताब्यात घेत अटक केली. त्याच्यासोबत त्याचे दोघे साथीदार करतारसिंग गुरुमुखसिंग जुनी आणि बलदेवसिंग बापूसिंग जुनी यांना देखील ताब्यात घेत अटक करण्यात आली. पुढील तपासकामी त्यांना पहुर पोलिस स्टेशनच्या ताब्यात देण्यात आले आहे