जळगाव दि.16 प्रतिनिधी – तालुक्यातील नागझिरी येथील श्रीक्षेत्र नागाई जोगाई मंदिरात महाशिवरात्रीनिमित्त नागाई जोगाईला अशोक जैन, सौ.ज्योती जैन यांच्याहस्ते महापूजा होणार आहे.
दि. 18 रोजी सकाळी 9.30 कांताई बंधाराजवळील नागाई जोगाई मंदीरात होणाऱ्या महापूजेचा सर्व भाविक भक्तांनी दर्शनाचा लाभ घ्यावा. असे ग्रामस्थ नागझिरी, मोहाडी, धानोरा, दापोरा, खेडी, कढोली, शिरसोली प्र.बो. व प्र.न. यांच्यावतीने नागाई-जोगाई मंदिर ट्रस्टचे अध्यक्ष प्रभाकर गोटु सोनवणे, उपाध्यक्ष श्रीमती लिलाताई भिलाभाऊ सोनवणे, नगरसेविका अंजनाताई सोनवणे यांनी केले आहे.