संगीत मार्तंड पंडित जसराज निवर्तले- शास्त्रीय गायनातील तपस्वी सूर्य मावळला

पंडीत जसराज

पंडीत जसराज यांचे आज अमेरिकेत निधन झाले आहे. त्यांचे वय 90 वर्ष होते. शेवटचा श्वास घेतलेल्या पंडीत जसराज यांना भारतीय शास्त्रीय संगीतातील संगीत मार्तंड म्हटले जाते. ते मेवाती या घराण्याचे प्रसिद्ध गायक होते. पंडित जसराज यांचा जन्म 28 जानेवारी 1930 रोजी झाला. बालपणापासून पंडीत जसराज यांनी त्यांचे वडील पंडीत मोतीराम यांच्याकडून शास्त्रीय संगीताचे पाठ घेतले.

थोरले बंधू मेवाती घराण्याचे महाराज जयवंतसिंह वाघेला तसेच उस्ताद गुलाम कादरखाँ यांच्याकडून जसराज यांनी गायनाचे शिक्षण घेतले. आग्रा घराण्याचे स्वामी वल्लभदास यांच्याकडून देखील पंडीत जसराज यांनी गायनाचे शिक्षण घेतले होते. एक तपस्वी गायक म्हणून त्यांची ख्याती होती.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here