बायकॉट चायनाचा नारा……….. चिनी बॅंकेने घेतले आयसीआयसीआय बॅंकेचे शेअर्स

ICICI

देशात चायना मालावर बहिष्कार टाकण्याची भाषा केली जात आहे. सर्वत्र चिनच्या विरोधी वातावरण निर्माण केले जात आहे. असे असले तरी चिनच्या पिपल्स बॅंक ऑफ चायनाने आयसीआयसीआय या बॅंकेचे शेअर्स खरेदी केले आहेत. चीनची केंद्रीय बँक आता अमेरिकेऐवजी भारतासह इतर देशात आपली गुंतवणूक वाढवत असल्याचे दिसून येत आहे. पीपल्स बँक ऑफ चायना ही बॅंक म्यूचुअल फंड व विमा कंपन्यांसह, आयसीआयसीआय बँकेत 15,000 कोटी रुपयांची गुंतवणूक करणाऱ्या 357 संस्थात्मक गुंतवणूकदारांपैकी एक बॅंक असल्याचे म्हटले जाते.

गत वर्षी मार्च महिन्यात चीनच्या केंद्रीय बॅंकेने एचडीएफसी बॅंकेत गुंतवणूक वाढवून 1 टक्क्याहून जास्त केली होती. त्यावेळी या मुद्द्यावरून प्रचंड गदारोळ माजला होता. पीपल्स बँक ऑफ चायना ही म्यूचुअल फंड आणि विमा कंपन्यांसह आयसीआयसीआय बँकेत 15,000 कोटीची गुंतवणूक करणाऱ्या 357 संस्थात्मक गुंतवणूकदारांपैकी एक मानली जाते. आपली आर्थिक स्थिती भक्कम करण्यासाठी संस्थात्मक गुंतवणूकदारांकडून पैसा मिळविण्याचा आयसीआयसीआय बॅंकेकडून प्रयत्न करण्यात आला होता. गेल्या आठवड्यातच त्यांचे टार्गेट पूर्ण करण्यात आले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here