जळगाव : महिलेची फक्त हाडे मिळून उघडकीस आलेल्या घटनेप्रकरणी चाळीसगाव ग्रामीण पोलिस स्टेशनला खूनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या किचकट गुन्ह्याच्या तपासाचे आव्हान चाळीसगाव ग्रामीण पोलिस स्टेशनला नव्याने दाखल झालेले पो.नि. ज्ञानेश्वर जाधव लिलया पेलतील आणि गुन्हा उघडकीस आणतील असे म्हटले जात आहे.
चाळीसगाव कन्नड महामार्ग क्र. 211 वरील घाटाच्या पायथ्याजवळ असलेल्या दर्ग्यापासून अंदाजे दोनशे मीटर अंतरावर पुर्व दिशेला बोढरे गावाच्या शिवारातील वन क्षेत्रातील झाडाझुडूपात मृतदेहाची हाडे मिळून आली आहेत. वन विभागाचे वनपाल दिपक किसन जाधव यांनी या घटनेप्रकरणी चाळीसगाव ग्रामीण पोलिस स्टेशनला दिलेल्या फिर्यादीनुसार अज्ञात इसमाविरुद्ध खूनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 12 मार्च 2023 च्या साधारण दोन ते तिन महिन्यापुर्वी हा गुन्हा घडल्याचे म्हटले जात आहे. दरम्यान या घटनेने परिसरात खळबळ माजली आहे.