तलवार घेवुन दहशत माजवणा-यास अटक

On: March 14, 2023 8:05 PM

जळगाव : तलवार हातात घेऊन परिसरात दहशत माजवणा-या फरार आरोपीस  एमआयडीसी पोलिस स्टेशनच्या गुन्हे शोध पथकाने अटक केली आहे. दिनकर उर्फ पिण्या रोहीदास चव्हाण (रा. सुप्रीम कॉलनी, जळगाव) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे.

दिनकर चव्हाण हा सुप्रिम कॉलनी परिसरातील रामदेव बाबा मंदीर परिसरात तलवार हातात घेऊन दहशत माजवत असल्याची गोपनीय माहिती पो.नि. जयपाल हिरे यांना समजली. त्या माहितीच्या आधारे त्यांनी आपले सहकारी पोलिस उप निरीक्षक आनंदसिंग पाटील, पोहेकॉ गणेश शिरसाळे, पोलिस नाईक विकास सातदिवे, किशोर पाटील, योगेश बारी, पो. कॉ.  किरण पाटील, नाना तायडे आदींना पुढील तपास आणि कारवाईकामी रवाना केले. तपास व शोध पथकाने दिनकर चव्हाण यास तलवारीसह ताब्यात घेत अटक केली आहे.

अटकेतील आरोपी दिनकर उर्फ पिण्या चव्हाण याच्याविरुद्ध एमआयडीसी पोलिस स्टेशनला गु.र.न. 145/2023 मुंबई पोलिस कायदा कलम 142 सह आर्म अॅक्ट 4/25 तसेच मुंबई पोलिस अधिनियम 37 (1) (3) चे उल्लंघन 135 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या गुन्ह्याचा पुढील तपास पोलिस नाईक विकास सातदिवे करत आहेत.  

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

Leave a Comment