विवाहीतेला पतीची शिवीगाळ तर नंदोईचे अश्लिल हातवारे

On: March 15, 2023 10:17 AM

जळगाव : कौटूंबिक वाद सुरु असलेली विवाहीता न्यायालयात तारखेवर आली असता तिला तिच्या पतीने अश्लिल शिवीगाळ तर त्याच्यासोबत आलेल्या तिच्या नंदोईने वाकडे बोट दाखवून अश्लिल हातवारे करत विनयभंग केल्याची घटना जळगाव न्यायालय आवारात घडली. या घटने प्रकरणी विवाहितेने जळगाव शहर गाठत दोघांविरुद्ध विनयभंगासह इतर कलमाखाली रितसर कायदेशीर गुन्हा दाखल केला आहे.

जळगाव शहरातील आदर्श नगर परिसरात राहणा-या विवाहितेचा कौटूंबिक हिंसाचार कायद्याखाली न्यायालयीन वाद सुरु आहे. या वादाच्या तारखेवर ती विवाहिता न्यायालयात हजर राहण्यास आली होती. त्यावेळी तिच्या नंदोईसह पतीने केलेल्या कृत्याविरुद्ध तिने जळगाव शहर पोलिस स्टेशनला गुन्हा दाखल केला. या घटनेनंतर दोघांनी आपला पाठलाग करुन शिवीगाळ केल्याचे देखील फिर्यादी पिडीत विवाहितेने म्हटले आहे. या गुन्ह्याचा पुढील तपास पोलिस नाईक दिलीप पाटील करत आहेत.   

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

Leave a Comment