मला ध्यानात ठेव मी तुला बघून घेईन – विद्यार्थ्यानीचा विनयभंग

On: March 16, 2023 11:03 AM

जळगाव : दहावीचा पेपर देण्यासाठी जाणा-या विद्यार्थीनीचा दररोज पाठलाग करणा-या विद्यार्थीनीचा अखेर हात धरुन मला ध्यानात ठेव मी तुला बघून घेईन असे म्हणणा-या विद्यार्थ्याविरुद्ध भडगाव पोलिस स्टेशनला विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

भडगाव तालुक्यातील विद्यार्थीनी दहावीचे पेपर सुरु असल्यामुळे गिरड येथील परिक्षा केंद्रावर नियमीत जात होती. दरम्यान 1 मार्च पासून एक विद्यार्थी त्या विद्यार्थीनीचा सातत्याने पाठलाग करत होता. 15 मार्च रोजी त्याने तिला अडवून तिचा हात धरला. मी तुझ्यावर प्रेम करतो. तु का नाही म्हणत आहे असे बोलून तिचा हात धरला. तु मला धान्यात ठेव मी तुला बघून घेईन अशी धमकी देत तो वर्गातून निघून गेला. या घटनेप्रकरणी अल्पवयीन मुलीने दिलेल्या फिर्यादीनुसार भडगाव पोलिस स्टेशनला रितसर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास सहायक पोलिस निरीक्षक चंद्रसेन पालकर करत आहेत.   

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

Leave a Comment