नवी दिल्ली : एसबीआयने ग्राहकांसाठी एक खास सुविधा आणली आहे. ग्राहक त्यांच्या बँक खात्यातून शिल्लक रकमेपेक्षा जास्त रक्कम काढू शकतात. बँकेच्या या सुविधेला ओव्हरड्राफ्ट फॅसिलिटी असे म्हणतात.
ओव्हरड्राफ्ट हे एक प्रकारचे कर्ज आहे. या माध्यमातून ग्राहक त्यांच्या बँक खात्यातून शिल्लक रकमेपेक्षा अधिक रक्कम काढू शकतात. ही रक्कम ग्राहकांना निश्चित कालावधी दरम्यान परत करावी लागते. या रकमेवर व्याज आकारले जाते. हे व्याज दिवसाप्रमाणे मोजले जाते. ओव्हरड्राफ्ट सुविधा कोणतीही बँक किंवा नॉन-फायनान्शिअल कंपनी देत असते. ओव्हरड्राफ्टची मर्यादा बँक किंवा एनबीएफसी ठरवते.
बँक त्यांच्या काही ग्राहकांना प्रीअप्रूव्ह्ड ओव्हरड्राफ्ट सुविधा देते. मात्र काही ग्राहकांना यासाठी रितसर वेगळी परवानगी घ्यावी लागते. यासाठी लेखी स्वरुपात इंटरनेट बँकिंगसाठी अर्ज द्यावा लागतो. काही बँका या सुविधेची प्रोसेसिंग फी घेतात. सिक्यूअर्ड आणि अनसिक्यूअर्ड अशा दोन प्रकारचे ओव्हरड्राफ्ट असतात. सिक्युअर्ड ओव्हरड्राफ्टमध्ये सुरक्षेसाठी काही तारण ठेवले जाते.
सिक्यूरिटी स्वरुपात काही नसले तरी देखील ओव्हरड्राफ्ट सुविधेचा लाभ घेता येतो त्याला अनसिक्यूअर्ड ओव्हरड्राफ्ट म्हटले जाते.