दाऊदच्या हस्तकाचा खुलासा- नेपाळमार्गे भारतात पाठवायचा नकली सोने व नोटा

On: August 18, 2020 9:44 PM

नेपाळ पोलिसांनी कुख्यात अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिम याचा हस्तक अल्ताफ हुसेन अन्सारी यास काठमांडू येथे शिताफीने अटक केली आहे. नेपाळच्या पर्सा जिल्हा पोलिस नियंत्रण कक्षाने याप्रकरणी माहिती दिली आहे. सन २०११ मध्ये सुमारे ५५ लाख रुपये किमतीचे बनावट भारतीय चलन जप्त केल्याप्रकरणी अल्ताफ हुसेन अन्सारी फरार होता. पोलिसांच्या चौकशीत त्याने बनावट नोटा व बनावट सोन्याचा पुरवठा होत असल्याची माहीती दिली आहे. हे नेटवर्क कसे चालत होते याची देखील त्याने माहिती दिली आहे. माहिती देतांना अल्ताफ हुसेन अन्सारी याने म्हटले आहे की या नेटवर्क मधे नेपाळमधील पाकिस्तानी दूतावासासह पाकिस्तानी गुप्तचर संस्था, आयएसआयची मदत मिळत होती.

नेपाळच्या पर्सा जिल्ह्यातील पोलिस अधिक्षक गंगा पंत यांनी सांगितले आहे की, अल्ताफ हा नेपाळमधील बारा जिल्ह्यातील हरपूर येथील राहणारा आहे. त्याने बिहार सीमेलगत नेपाळी वस्तीचे शहर वीरगंज येथे वास्तव्य केले होते. तीन दिवसांपूर्वी पोलिसांनी त्याला ताब्यात घेत अटक केली आहे. अतिशय गोपनीय ठिकाणी त्याची राहण्याची व्यवस्था चोख बंदोबस्तात केली असून त्याची सखोल चौकशी केली जात आहे.नेपाळ पोलिसांच्या ताब्यातील दाऊदचा साथीदार अल्ताफ हुसेन अन्सारी याच्याकडून विविध गुपीते उघडकीस आणली जात आहेत.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

Leave a Comment