जळगाव – बॉक्स ऑफ हेल्प फाउंडेशनच्या वतीने जळगाव शहरातील पेट्रोल पंपावर काम करणाऱ्या महिला भगिनींचा सत्कार करण्यात आला. यावेळी त्यांना फुल आणि साडी देऊन सन्मानित करण्यात आले.
गेल्या मार्च महिन्यात विविध क्षेत्रात काम करणाऱ्या महिलांचा सत्कार करण्यात आला. मात्र पेट्रोल पंपावर काम करणाऱ्या कोणत्याही महिलेचा सत्कार करण्यात आला नव्हता. या गोष्टीची दखल घेत ‘बॉक्स ऑफ हेल्प फाउंडेशन’च्या वतीने या भगिनींचा सत्कार करण्यात आला. या सत्कारासाठी राजश्री शर्मा, सुनिता चौधरी आणि संगीता पाटील यांचे सहकार्य लाभले.