बहिणीच्या विनयभंगाचा जाब विचारणा-या तरुणावर धारदार शस्त्राने हल्ला

जळगाव : तरुणीचा हात धरुन तिला माझ्यासोबत चल असे म्हणणा-या तरुणाला समजावण्यास गेलेल्या तरुणीच्या भावावर हल्ला करत मारहाण करुन जखमी केल्याप्रकरणी एमआयडीसी पोलिस स्टेशनला चौघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. नितीन दहीयेकर, सनी दहियेकर, राहुल दहीयेकर, विजय दहियेकर (चौघे रा. जाखनी नगर – कंजरवाडा जळगाव) अशी गुन्हा दाखल करण्यात आलेल्या चौघांची नावे आहेत.

धुणी भांडी करणारी तरुणी 3 एप्रिल रोजी सायंकाळी सिंधी कॉलनी रस्त्याने जात होती. त्यावेळी नितीन दहियेकर याने तिचा उजवा हात पकडून माझ्यासोबत चल असे म्हटले. या प्रकारामुळे तिच्या मनात लज्जा निर्माण झाली. या घटनेची माहिती तिच्या भावाला समजल्यानंतर तो नितीन दहीयेकर याला समजावण्यासाठी गेला. त्यावेळी नितीन याने तरुणीच्या भावासोबत वाद घातला.

त्यावेळी हजर असलेले सनी, राहुल आणि विजय या तिघांनी त्याला चापटा बुक्क्यांनी मारहाण सुरु केली. त्याच वेळी नितीन याने तरुणीच्या भावाला हातातील धारदार शस्त्राने उजव्या डोळ्याच्या वर कपाळावर मारहाण करून जखमी केले. सनी दहीयेकर याने हातातील लोखंडी रॉडने त्याच्या पाठीवर मारहाण करुन जखमी केले. याप्रकरणी दाखल गुन्ह्याचा पुढील तपास पोलिस नाईक अतुल पाटील करत आहेत.      

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here