साडे आठ लाखाच्या अपहार प्रकरणी गुन्हा

On: April 11, 2023 8:14 AM

जळगाव : सावदा मर्चंट को ऑप सोसायटी लि. सावदा ता. रावेर या सावदा येथील पतसंस्थेचे तत्कालीन मुख्य व्यवस्थापक रविंद्र रमेश वाणी यांच्याविरुद्ध सावदा पोलिस स्टेशनला साडे आठ लाख रुपयांच्या अपहार केल्याच्या आरोपाखाली फसवणूकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. जळगावचे वकील तथा या क्रेडीट सोसायटीचे अवसायक अ‍ॅड. राहुल प्रकाश मुजुमदार यांनी याप्रकरणी सावदा पोलिस स्टेशनला फिर्याद दाखल केली आहे.

सन 2012 ते सन 2013 या कालावधीत आणि सन 2013 ते 14 ऑक्टोबर 2021 दरम्यानच्या कालावधीत हा अपहार झाला असल्याचा आरोप आहे. तत्कालीन मुख्य व्यवस्थापक पदावर कार्यरत असतांना रविंद्र वाणी यांनी पतसंस्थेचे कर्जदार पुनाजी इंगळे,सौ. अनुसया पुनाजी इंगळे, कै. राम पुनाजी इंगळे, सौ. किर्ती शाम इंगळे, शाम पुनाजी इंगळे, शाम पुनाजी इंगळे, अजय पुनाजी इंगळे, विजय मुरलीधर पाटील, खुशाल दत्तात्रय चोपडे आदींकडून कर्ज रकमेपोटी मुद्दल आणी व्याजासह साडे आठ लाख रुपये रक्कम स्विकारली होती. ती रक्कम भरणा करुन बनावट दाखले व कर्ज भरल्याच्या बनावटपावत्या अदा करुन ही स्विकारलेली रक्कम पतसंस्थेच्या बॅंक खाती जमा न करता परस्पर स्वत:च्या फायद्यासाठी अपहार करुन संस्थेचीफसवणूक केल्याचा आरोप आहे. या गुन्ह्याचा पुढील तपास पोलिस उप निरीक्षक विनोद खांडबहाले करत आहेत.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

Leave a Comment