नवी दिल्ली : रिलायन्स इंडस्ट्रीजची सहाय्यक कंपनी रिलायन्स रिटेल व्हेंचर्स लिमिटेडने ऑनलाईन फार्मसी नेटमेड्समध्ये साठ टक्के हिस्सेदारी खरेदी केली आहे. रिलायन्सने हा करार 620 कोटी रुपयात केला आहे.
रिलायन्स रिटेल व्हेंचर्स लिमिटेडने ही हिस्सेदारी व्हिटेलिक हेल्थ प्रायव्हेट लिमिटेडमध्ये विकत घेतली आहे. या कंपनीच्या सहाय्यक कंपन्यांची नेटमेड्स या नावाने ओळख आहे. रिलायन्सने अन्य कंपन्या त्रिसारा हेल्थ प्रायव्हेट लिमिटेड, नेटमेड्स मार्केटप्लेस लिमिटेड आणि दाधा फार्मा डिस्ट्रिब्यूशन प्राइवेट लिमिटेड आदींमध्ये पुर्ण शंभर टक्के मालकी विकत घेतली आहे. नेटमेड्स सध्या औषधी, पर्सनल केअर, बेबी केअर अशी उत्पादने विक्री करते. ही कंपनी अॅपच्या माध्यमातून डॉक्टर अपॉईंटमेंट बुकिंग तसेच डायग्नोसिसची सेवा देखील पुरवते. नेटमेड्स कंपनीला गेल्या वर्षभरापासून खरेदीदाराची गरज होती. रिलायन्स रिटेल व्हेंचर्सच्या संचालक ईशा अंबानी आहेत.