जळगाव : सातबारा उता-यावर तक्रारदारासह इतर वारसांची नावे लावण्याकामी पंधराशे रुपयांची लाच स्विकारणा-या तलाठ्यासह मागणी करणारी महिला कोतवाल असे दोघे लाचखोर आज जळगाव एसीबीच्या ताब्यात आले आहेत. सलीम अकबर तडवी असे भडगाव तालुक्यातील सजा निंभोरा (प्रभारी चार्ज मौजे भोरटेक बुद्रुक) येथील तलाठ्याचे आणि कविता नंदु सोनवणे असे भोरटेक बुद्रुक येथील महिला कोतवालाचे नाव आहे.
या घटनेतील तक्रारदाराची वडीलोपार्जीत शेतजमीन भोरटेक बुll ता.भडगाव तलाठी कार्यालय हद्दीत आहे. तक्रारदाराचे वडील मयत झाले असून त्या शेतजमीनीच्या सात बारा उता-यावर स्वत: तक्रारदारासह इतर नऊ जण मिळून एकुण दहा जणांची नावे लावायची होती. याकामी एकुण अडीच हजार लाचेची मागणी तलाठी आणी महिला कोतवाल या दोघांकडून झाली होती. तलाठी सलीम तडवी यांनी यापुर्वी तक्रारदाराकडून एक हजार रुपये लाचेच्या रुपात जागेवरच घेतले होते. उर्वरीत दिड हजार लाचेची रक्कम महिला कोतवालसमक्ष तलाठी सलीम तडवी यांनी घेताच दोघांना एसीबी पथकाने आपल्या ताब्यात घेतले. भडगाव पोलिस स्टेशनला दोघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
उप विभागीय अधिकारी शशीकांत पाटील यांच्या पथकातील स.फौ.दिनेशसिंग पाटील, स.फौ.सुरेश पाटील, पो.हे.कॉ.अशोक अहिरे, पो.हे.कॉ.सुनिल पाटील, पो.हे.कॉ.रविंद्र घुगे, म.पो.हे.कॉ. शैला धनगर, पो.ना.जनार्दन चौधरी, पो.ना.किशोर महाजन, पो.ना.सुनिल वानखेडे, पो.ना.बाळु मराठे, पो.ना.ईश्वर धनगर, पो.कॉ.राकेश दुसाने. पो.कॉ.प्रदिप पोळ , पो.कॉ.सचिन चाटे, पो.कॉ.अमोल सुर्यवंशी, पो.कॉ.प्रणेश ठाकुर आदींनी या कारवाईत सहभाग घेतला.