कुलर चोरणा-या तिघांना अटक

जळगाव : कुलर तयार करणा-या कंपनीतून कुलर आणी गॅस सिलेंडरची चोरी करणा-या तिघांना एमआयडीसी पोलिस स्टेशनच्या गुन्हे शोध पथकाने अटक केली आहे. धनराज अवदेश पासवान, विपुल प्रकाश पाटील आणि निखील उत्तम धनगर (तिघे रा. शिवशाही हॉटेलच्या मागे, कुसुंबा – जळगाव) अशी अटक करण्यात तिघांची नावे आहेत. कंपनी मालक विशाल भागवत ढवळे यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार अज्ञात चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला होता.  

14 एप्रिल 2023 च्या रात्री विशाल ढवळे यांच्या बंद कंपनीच्या शटरचे कुलूप तोडून चोरट्यांनी आत प्रवेश करुन चार कुलर, एक गॅस सिलेंडर चोरुन नेले होते. यावेळी दोन सीसीटीव्ही कॅमे-यांचे नुकसान देखील करण्यात आले होते. तपासादरम्यान धनराज अवदेश पासवान, विपुल प्रकाश पाटील आणि निखील उत्तम धनगर या तिघांनी हा चोरीचा गुन्हा केल्याचे उघड झाले होते. पो.नि. जयपाल हिरे यांना गुप्त बातमीदारांनी दिलेली माहिती आणि तपासाअंती उघड झालेली माहिती जुळून आली.

पोलीस निरीक्षक जयपाल हिरे यांच्या मार्गदर्शनाखाली स.फौ. अतुल वंजारी, पोहेकॉ. रामकृष्ण पाटील, पो.ना. किशोर पाटील, विशाल कोळी, चंद्रकांत पाटील, सचिन पाटील आदींनी विविध ठिकाणाहून तिघांना शिताफीने ताब्यात घेत अटक केली. त्यांच्या कब्जातून चोरी झालेले चौदा हजार रुपये किमतीचे चार लोखंडी कुलर, एक गॅस सिलेंडर असा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे. अटकेतील तिघांना न्या. वांगडोळे यांच्या न्यायालयात हजर केले असता त्यांना 17 एप्रिल पर्यंत पोलिस कोठडी सुनावली होती. सरकार पक्षाच्या वतीने अ‍ॅड. स्वाती निकम यांनी न्यायालयीन कामकाज पाहीले. अटकेतील तिघांकडून अजून गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here