जळगाव जिल्ह्यातून तिन गुन्हेगारांची हद्दपारी

On: May 10, 2023 10:00 PM

जळगाव : जळगाव जिल्ह्यातून तिघा गुन्हेगारांना दोन वर्षासाठी हद्दपार करण्यात आले आहे. इरफान हबीब तडवी (टोळी प्रमुख), जमील ऊर्फ गोलू बिस्मील्ला तडवी (टोळी सदस्य), आणि शब्बीर रमजान तडवी (टोळी सदस्य) अशी हद्दपार करण्यात आलेल्या रावेर तालुक्यातील पिंप्री येथील तिघांची नावे आहेत.

हद्दपार करण्यात आलेल्या तिघांविरुद्ध रावेर पोलिस स्टेशनला विविध गुन्हे दाखल आहेत. रावेर शहरात शांतता ठेवण्याबाबत तिघांविरुद्ध वेळोवेळी प्रतिबंधात्मक कारवाया करण्यात आल्याहोत्या. तरीदेखील त्यांच्या वर्तनात सुधारणा झाली नाही. त्यांच्यात सुधारणा होण्याच्या दृष्टीने पोलिस अधिक्षकांच्या आदेशाने त्यांना जळगाव जिल्ह्यातून दोन वर्षासाठी हद्दपारीचे आदेश काढण्यात आले आहेत.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

Leave a Comment