जळगाव : शॉर्ट सर्कीट मुळे उस जळून खाक झाल्याने शेतकरी हवालदिल झाला आहे. आपल्या नुकसानीची भरपाई मिळावी अशी रास्त अपेक्षा आणि मागणी हवालदिल झालेल्या शेतक-याने शासनाकडे केली आहे. जळगाव तालुक्यातील वावडदा या गावी हा प्रकार घडला आहे. जानकीराम फकीरा पाटील असे नुकसानग्रस्त शेतक-याचे नाव आहे.
वावडदा येथील शेतकरी जानकीराम फकीरा पाटील यांनी आपल्या शेतात अपार कष्ट करुन उसाची लागवड केली होती. त्या उसाचा वापर ते आपल्या रसवंतीवर करत होते. हाता तोंडाशी आलेला घास शॉर्ट सर्कीटमुळे निघून गेल्याची खंत शेतकरी जानकीराम पाटील यांनी व्यक्त केली आहे. सुमारे चार लाख रुपयांचे झालेले नुकसान भरुन निघणे शक्य नसल्याची देखील खंत शेतकरी जानकीराम पाटील यांनी व्यक्त केली आहे.