दरोड्याच्या गुन्ह्यातील दोघांना अटक – मित्रानेच रचला होता प्लॅन

जळगाव  : धरणगाव – अमळनेर रस्त्यावर भर दुपारी झालेल्या दरोडयाचा गुन्हा स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने उघडकीस आणला असून दोघांना अटक करण्यात आली आहे. विशाल चंद्रकांत भालेराव (रा. भालोद ता. यावल) आणि अविनाश देवेंद्र तायडे (रा. अट्रावल ता. यावल) अशी अटक करण्यात आलेल्या दोघांची नावे आहेत. अमळनेर पोलिस स्टेशनला दाखल गुन्हा उघडकीस आला आहे.

या घटनेतील फिर्यादी हा 23 मे 2023 रोजी अमळनेर येथून जळगावला नवीपेठ परिसरातील बॅंकेत दोन लाख रुपये काढण्यासाठी अ‍ॅक्टीव्हा मोटार सायकलने आला होता. फिर्यादी जळगाव येथे दोन लाख रुपये काढण्यासाठी जळगावला येणार असल्याची माहिती त्याचा मित्र अविनाश तायडे याला समजली होती. त्या माहितीच्या आधारे अविनाश तायडे याने त्याचे चौघे साथीदार बोलावून घेतले होते.  

सर्वजण जळगावच्या नवीपेठ परिसरातील बॅंक परिसरात ओळख लपवून थांबले होते. त्यानंतर फिर्यादी बँकेतून पैसे काढून बाहेर आला. त्याने रकमेची पिशवी अॅक्टीवा वाहनाच्या डिक्कीत ठेवली. अविनाश तायडे व त्याच्या साथीदारांनी त्याचा पाठलाग सुरु केला. जळगाव शहराच्या बाहेर धरणगाव गेल्यानंतर म्हसले गावाच्या अलीकडे फिर्यादीस अडवून त्याला चाकूने मारहाण करण्यात आली. दोन लाख रुपयांची बॅग हिसकावून सर्वांनी पलायन केले होते. या घटने प्रकरणी अमळनेर पोलिस स्टेशनला गुन्हा नोंद करण्यात आला होता.

या गुन्ह्याचा समांतर तपास स्थानिक गुन्हे शाखेचे पो.नि. किसनराव नजनपाटील व त्यांचे सहकारी करत होते. अधिक तपासाअंती पो.नि. किसनराव नजनपाटील यांना समजलेल्या माहितीच्या आधारे विशाल चंद्रकांत भालेराव आणि अविनाश देवेंद्र तायडे या दोघांना चौकशीकामी ताब्यात घेण्यात आले. दोघांनी चौकशीअंती आपला गुन्हा कबुल केला. दोघांना अटकेअंती अमळनेर पोलिस स्टेशनच्या ताब्यात देण्यात आले आहे.

स्थानिक गुन्हे शाखेचे पो.नि. किसनराव नजनपाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उप निरीक्षक गणेश वाघमारे, हे.कॉ. विजयसिंग पाटील, सुधाकर अंभोरे, जितेंद्र पाटील, महेश महाजन, विजय पाटील, अक्रम शेख, संदिप सावळे, लक्ष्मण पाटील, नितीन बावीस्कर, प्रमोद लाडवंजारी, किरण धनगर, नंदलाल पाटील, भगवान पाटील, प्रितम पाटील, संदिप पाटील, प्रविण मांडोळे, सचिन महाजन, ईश्वर पाटील, लोकेश माळी, चालक हे.कॉ. भरत पाटील, महेश सोमवंशी, प्रमोद ठाकूर आदींनी या गुन्ह्यच्या तपासकामी सहभाग घेतला. या गुन्ह्यात  भा.द.वि. कलम 341, 395, 397 वाढीव कलम लावण्यात आले आहे.

jain-advt

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here