जैन इरिगेशनतर्फे मुक्ताबाईंच्या पंढरपूर पालखीचे भव्य स्वागत

जळगाव, ३ जून २०२३ (प्रतिनिधी):- आज श्रीराम मंदिर संस्थान (कान्हदेश द्वारा संचलित) जळगाव ते श्रीक्षेत्र पंढरपूर येथे जाणाऱ्या वारीचे जैन हिल्सच्या व्हीआयपी गेटजवळ पोहोचल्यावर जैन इरिगेशन सिस्टीम्स लिमि़टेड तर्फे भव्य स्वागत करण्यात आले. जैन इरिगेशनतर्फे सिनियर व्हाईस प्रेसिडेंट (अॅग्री आर अँड डी) डॉ. अनिल ढाके यांनी श्रीसंत मुक्ताबाई यांच्या पादुकांची पूजा केली.

त्यानंतर सिनियर व्हाईस प्रेसिडेंट (अॅग्री बायोटेक आर अँड डी) डॉ. बी. के. यादव यांनी श्रीसंत मंगेश जोशी महाराज यांची पाद्य पूजा केली. याप्रसंगी एचआरडी विभागाचे श्री. पी. एस. नाईक, एस. बी, ठाकरे, भिकेश जोशी, आर. डी. पाटील, जीआरएफचे समन्वयक उदय महाजन, जी. आर. पाटील यासह मिडीया विभागातील सहकारी पालखीच्या स्वागतासाठी उपस्थित होते. कंपनीच्यावतीने राजा भोजच्या भीमराव दांडगे व सहकाऱ्यांनी वारकऱ्यांची फराळाची व्यवस्था केली होती. 

जैन इरिगेशन कंपनीने या यात्रेबरोबर मुक्ताबाईंच्या पालखीबरोबर मदत म्हणून एक वाहन उपलब्ध करुन दिले आहे. हे वाहन पालखीबरोबरच जाईल.  या पालखीची स्थापना १७९४ला झाली तेव्हापासून अखंडपणे हा पालखी सोहळा होत असतो. दर वर्षी ही वारी जात असताना जैन हिल्स येथे आदरातीथ्य स्वीकारून पुढे मार्गस्थ होते. 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here