जळगाव दि. ६ जून (प्रतिनिधी)– जैन इरिगेशनच्या विविध आस्थापनांमध्ये वृक्षारोपण करून जागतिक पर्यावरण दिन उत्साहात साजरा करण्यात आला. प्रदुषणामुळे पर्यावरणाला धोका पोहोचत आहे. त्यावर उपाय योजना म्हणजे जास्तीतजास्त वृक्षारोपण करणे होय. याशिवाय जागतिक पर्यावरण दिनाचे प्राथमिक उद्दिष्ट म्हणजे अस्तित्वात असलेल्या पर्यावरणीय परिस्थितींबद्दल जनजागृती करणे हे होय. या औचित्याने जैन हिल्स, जैन फूडपार्क, जैन प्लास्टिक पार्क, टिश्युकल्चर प्लान्ट फॅक्टरी टाकरखेडा अशा विविध ठिकाणी वृक्षारोपण झाले. सायंकाळी भाऊंच्या उद्यानासमोर नागरिकांना विनामूल्य रोपे वाटप केली गेली. सीताफळ, जांभूळ, निंब, पेरु, करंज तसेच फुलझाड पर्यावरणाच्या दृष्टीने महत्त्वाची असे अनेक प्रकारची ७०० रोपे कंपनीतर्फे वितरीत केली गेली. नागरिकांचा यास उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.
जैन प्लास्टिक पार्क – पर्यावरण जपण्याच्यादृष्टीने ५ जून हा जागतिक पर्यावरण दिवस खूप मोलाचा ठरतो. कंपनीच्या जैन प्लास्टिक पार्क येथे कंपनीच्या सहकाऱ्यांच्याहस्ते वृक्षारोपण केले गेले. त्यामध्ये वरीष्ठ अधिकारी सी.एस.नाईक, जनमेजय नेमाडे, राजीव सरोदे, डॉ. योगेश बाफना, आर. एस. पाटील, दिलीप वाघ, यू.बी. महाजन, या सहकाऱ्यांच्याहस्ते वृक्षारोपण झाले.
जैन फूड पार्क व जैन एनर्जीपार्क – जैन फुड पार्क जैन व्हॅली येथे ५ जून पर्यावरण दिनानिमित्त वडाच्या झाडाचे रोप लाऊन त्याची पूजा करण्यात आली. प्रदीप साखंला, सुनील गुप्ता, जी,आर, पाटील, जी,आर, चौधरी, वाय,जे पाटील साहेब, संजय पारख, अस्लम देशपांडे, सेफ्टी सुरक्षा अधिकारी स्वप्नील चौधरी, अमोल पाटील अग्निशमन दलाचे अधिकारी कैलास सैंदाणे व सहकाऱ्यांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आले. त्याच प्रमाणे जैन एनर्जी पार्क येथे ऐ.के.सिंग, आर.बी. येवले, एस.बी. ठाकरे, व्ही.आर. सुब्रमण्यम, अरविंद कडू यांच्या हस्ते वृक्षारोपण झाले.
जैन अॅग्रिपार्क – जैन अॅग्रिपार्क अर्थात जैन हिल्स येथे वृक्षारोपण करण्यात आले. मनिष शहा, विकास मल्हारा, गिरीश कुळकर्णी, संजय साळी, ज्ञानेश्वर शेंडे, सुनील खैरनार, विजय जैन, डॉ. योगराज पाटील तसेच गार्डन विभागाचे प्रमुख अजय काळे यांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आले.