खून झालेल्या तरुणाची पटली ओळख

On: June 6, 2023 9:14 PM

जळगाव : मुक्ताईनगर – बोदवड रस्त्यावरील मुक्ताई मंदिराच्या मागील बाजूस आज एका तरुणाचा मृतदेह आढळून आला. दगडाने ठेचून चेहरा छिन्नविच्छिन्न असलेल्या अवस्थेत आढळून आलेल्या तरुणाची ओळख पटली आहे. रावेर तालुक्यातील चिनावल येथील रविंद्र मधुकर पाटील असे मयत तरुणाचे नाव आहे. गेल्या दोन दिवसांपासून रविंद्र पाटील हा मृतावस्थेत पडून असल्याचे म्हटले जात आहे.

रावेर तालुक्यातील चिनावल येथील नम्रता पाटील यांनी आपले पती रविंद्र पाटील हे गेल्यादोन दिवसांपासून बेपत्ता असल्याची तक्रार सावदा पोलिस स्टेशनला दाखल केली. दरम्यान मुक्ताईनगर येथे तरुणाचा मृतदेह आढळून आला. मिसींग मधील तरुणाचे वर्णन मुक्ताईनगर येथील मयत तरुणाच्या वर्णनासोबत जुळून आले. मयत रविंद्र पाटील यांच्या हातावर त्यांची मुलगी रोशनी हिचे नाव गोंदलेले होते. गोंदलेल्या शब्दांवरुन ओळख पटण्यात मदत झाली.

रवींद्र पाटील हे पतपेढीत नोकरीला होते. 4 मे रोजी त्यांचे पत्नीसोबत बोलणे झाले होते. रविंद्र पाटील यांच्यामृतदेहापासून काही अंतरावर त्यांची दुचाकी देखील पोलिसांना आढळून आली आहे. कुणीतरी जवळच्या मित्राने अथवा परिचीताने हा खून केला असल्याची शक्यता वर्तवली जात आहे.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

Leave a Comment