नवी दिल्ली : बलात्कार प्रकरणातील फरार आरोपी तसेच स्वयंघोषित आध्यात्मिक गुरु स्वामी नित्यानंद हा सध्या सध्या मेक्सिकोजवळील बेलाइज् येथे आहे. या फरार आरोपीने रिझर्व बॅंक ऑफ कैलास या नावाने बॅंकेच्या स्थापनेची घोषणा केली आहे. गणेश चतुर्थीच्या मुहूर्तावर तो आपले चलन लाँच करणार असल्याचे त्याने म्हटले आहे.
काही दिवसांपुर्वी या फरार नित्यानंदने एक व्हिडिओ जारी केला होता. त्या व्हिडीओत त्याने स्वत:च्या बॅंकेची घोषणा केली. आपले सर्व काम कायदेशीर असल्याचे त्याचे म्हणणे आहे. अमेरिकेतील इक्वोडोर देशाच्या नजीक एक बेट असून त्या बेटाला त्याने स्वत:चा स्वतंत्र कैलास नावाचा देश घोषित केला आहे.
राजशेखरन असे मुळ नाव असलेला नित्यानंद हा तामिळनाडूचा मुळ रहिवासी आहे. सन २००० मधे त्याने बंगळूरु शहरानजीक स्वत:चा आश्रम सुरु केला. तेव्हापासूनच चर्चेत आलेला नित्यानंद स्वत:ला इश्वरी अवतार मानू लागला. सन २०१० मधे त्याच्यावर दोन मुलींचे अपहरण व बलात्काराचा आरोप व गुन्हा अहमदाबाद पोलिसात दाखल करण्यात आला. सन 2018 मधे कर्नाटक राज्यातील न्यायालयात त्याचा जामीन मंजुर झाला व त्यानंतर तो विदेशात फरार झाला.