जळगाव : जुन्या वादातून विषारी पदार्थ पाजल्याने औषधोपचारा दरम्यान निधन झालेल्या तरुणाच्या मृत्यूप्रकरणी एमआयडीसी पोलिस स्टेशनला चौघांविरुद्ध खूनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या चौघा जणांना एमआयडीसी पोलिस स्टेशनच्या गुन्हे शोध पथकाने अटक केली आहे. जळगाव शहरातील रामेश्वर कॉलनी परिसरातील रहिवासी सचिन कैलास चव्हाण, तुषार उर्फ सोन्या विजय पाटील, सनी उर्फ फौजी बाळकिशन जाधव, कुदंन रविंद्र पाटील अशी अटक करण्यात आलेल्या चौघांची नावे आहेत. चेतन प्रकाश चौधरी असे मरण पावलेल्या तरुणाचे नाव आहे.
जुन्या वादाच्या कारणातून चौघांनी 11 जून रोजी प्रकाश रघुनाथ चौधरी यांचा मुलगा चेतन प्रकाश चौधरी यास काहीतरी विषारी पदार्थ पिण्यास दिला होता. त्यामुळे त्याला त्रास सुरु झाला. औषधोपचार सुरु असतांना चेतन मरण पावल्याने एमआयडीसी पोलिस स्टेशनला भाग 5 गु.र.न. 383/2023 भादवि कलम 302, 120[ब], 34 प्रमाणे दिनांक 13 जून रोजी दुपारी पाच वाजेच्या सुमारास गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलीस निरीक्षक जयपाल हिरे यांच्या पथकातील पोलिस उप निरीक्षक दिपक जगदाळे, आनंदसिंग पाटील, पोहेकॉ गणेश शिरसाळे, पोना विकास सातदिवे, किशोर पाटील, पंकज पाटील, पोकॉ. छगन तायडे, ईश्वर भालेराव, चंद्रकांत पाटील, ललित नारखेडे, सतिष गर्जे, पोहेकॉ चालक इम्तीयाज खान आदींनी चौघांना शिताफीने अटक केली आहे. पुढील तपास पोलिस उप निरीक्षक दिपक जगदाळे करत आहेत.